‘ग्लोबल पीस इंडेक्स २०१८’ मध्ये भारत १३७ व्या स्थानावर

भारत

भारतात गुन्हेगारीची संख्या कमी झाली आहे… सर्वत्र सुख, शांती आणि समाधान नांदत आहे…, सगळचं कस आलबेल आहे, असं आम्ही नाही तर ऑस्ट्रेलियातील ‘इंस्टीट्यूट ऑफ इकोनॉमिक्स अँड पीस’ (आयआयपी) यांचं मत आहे. ‘ग्लोबल पीस इंडेक्स २०१८’ ने जगातील १६३ देशांना त्यांच्या गुन्हेगारी प्रमाणानुसार क्रमवारी दिली असून याबाबतचा अहवाल आयआयपीने जारी केला आहे.

‘ग्लोबल पीस इंडेक्स २०१८’ मध्ये भारत १३७ व्या क्रमांकावर आला असून गेल्या वर्षीपेक्षा भारत चार पाऊल वर चढला आहे. गेल्या वर्षी भारत १४१ व्या स्थानावर होता. तर २००८ पासून पहिल्या स्थानावर असलेल्या आइसलँड देशाने यंदाही आपली जागा कायम ठेवली आहे. सीरिया हा जगातील सर्वात जास्त गुन्हेगारीचा देश ठरला आहे. सीरिया या स्थानावर गेल्या ५ वर्षांपासून आहे. त्यासोबतच अफगाणिस्तान, दक्षिण सूडान, इराक आणि सोमालिया हे देखील कमी शांतीप्रिय देश ठरले आहेत.

आयआयपीच्या मते, सर्वाधीक तणाव हा शेजारील देशासोबत असलेल्या संघर्षामुळे निर्माण होतो. ज्या देशांमध्ये गेल्या ३० वर्षांत मोठ्या प्रमाणात शस्त्र बाळगण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये मिस्त्र, भारत, इराण, पाकिस्तान, दक्षिण कोरिया आणि सीरिया या देशांचा समावेश आहे.

‘ग्लोबल पीस इंडेक्स २०१७’ मध्ये शांततेचा स्तर ०.२७ टक्के इतका होता. त्या तुलनेत यंदाच्या वर्षी ९२ देशांमधील परिस्थितील खराब झाली असून ७१ देशांच्या स्थितीत सुधारणा झाली आहे.

जगातील टॉप ५ शांतिपूर्ण देश

  • आइसलँड
आइसलँड
  • न्यूझिलँड
न्यूझिलँड
  • ऑस्ट्रिया
ऑस्ट्रिया
  • पुर्तगाल
पुर्तगाल
  • डेनमार्क
डेनमार्क