भाजप सरकार पाकविरोधी – इम्नान खान

२०१९ साली होणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप सरकार मुस्लिमविरोधी आणि पाकिस्तानविरोधी भूमिका घेत असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी केलं आहे. शिवाय, २०१९च्या निवडणुकीनंतर भारत - पाक संबंध सुधारतील असं मत देखील यावेळी इम्नान खान यांनी केलं आहे.

Washington
Imran khan and narendra modi
इम्रान खान आणि नरेंद्र मोदी

२०१९ साली होणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप सरकार मुस्लिमविरोधी आणि पाकिस्तानविरोधी भूमिका घेत असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी केलं आहे. शिवाय, २०१९च्या निवडणुकीनंतर भारत – पाक संबंध सुधारतील असं मत देखील यावेळी इम्नान खान यांनी केलं आहे. अमेरिकेतील वॉशिग्टंन पोस्ट या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपलं मत मांडलं आहे. या मुलाखती दरम्यान पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणावर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. दरम्यान भारत – पाक संबंध सुधारण्यामध्ये भारताकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही का? असा सवाल देखील इम्नान खान यांना केला गेला. त्यावेळी त्यांनी माझ्या प्रत्येक सकारात्मक पावलाला भारत सरकार नकारात्मक प्रतिसाद देतंय असं म्हटलं. पण, हे सारं २०१९च्या लोकसभा निवडणुकांसाठी सुरू असून २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारत – पाक संबंधांवर चर्चा सुरू होईल असं इम्नान खान यांनी म्हटलं आहे.

तसंच मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी पकडले जाणे हे पाकच्या हिताचं आहे. मी याबाबत अधिकाऱ्यांना जातीनं लक्ष घालून तशा सुचना केल्याचं इम्नान खान यांनी यावेळी सांगितलं.

वाचा – दहशतवादाच्या मुद्यावर भारत पाकला मदत करेल – राजनाथ सिंह

पाकच्या उलट्या बोंबा

दरम्यान, वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये इम्नान खान द्विपक्षीय संबंध सुधारण्यामध्ये भारत आडकाठी करत असल्याचं खोटं विधान केलं आहे. कारण, यापूर्वीच भारतानं चर्चेसाठी हात पुढे केला आहे. तसे प्रयत्न वेळोवेळी भारताकडून झाले देखील. पण, पाकिस्तानकडून मात्र खोडा घातला गेला. इम्नान खान पंतप्रधान झाल्यापासून दहशतवादी कारवाया देखील वाढल्या आहेत. त्यामुळे भारतानं आधी दहशतवाद थांबवा मग चर्चा करा अशी तंबी पाकला दिली आहे. पण, पाकिस्तानकडून मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. शिवाय, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दहशतवादाशी लढण्यासाठी  भारत मदत करेल अशी ग्वाही दिली आहे. त्यानंतर देखील पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here