Video – ISI एजंटने केला भारतीय राजदूताचा पाठलाग!

इलाहाबादमध्ये भारताचे वरिष्ठ राजदूत गौरव अहुवालिया यांच्या घराबाहेर आयआसआयने कार आणि दुचाकीसह काही जण तैनात केल्याचं दिसत आहे.

Mumbai
गौरव अहुवालिया

सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. पण पाकिस्तानच्या खुरापती काही संपायचं नाव घेत नाही. या कोरोनाच्या संकटातही पाकिस्तान भारताविरोधात कटकारस्थान करत आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी दुतावासात काम करणारे दोन अधिकारी हेरगिरी करताना रंगेहात पकडले. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांनी ताब्यात घेतलं. त्यांना देशातून बाहेर काढण्यात आलं. त्याच रागापोटी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आयएसआयनं आता इलाहाबादमधील भारतीय राजदूताला त्रास द्यायला सुरूवात केली आहे.

इलाहाबादमध्ये भारताचे वरिष्ठ राजदूत गौरव अहुवालिया यांच्या घराबाहेर आयआसआयने कार आणि दुचाकीसह काही जण तैनात केल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून अहुवालिया यांना धमक्याही दिल्या जात आहेत. सर्व देशाच्या राजदूतांना व्हिएन्ना कराराच्या अंतर्गत सुरक्षा दिली जाते. मात्र आहुवालिया यांना येणाऱ्या धमक्यांमुळे भारतीय राजदूतांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उभा राहिला आहे.

या आधीही दिला होता त्रास

राजदूत गौरव अहुवालिया यांना या आधीही असाच त्रास देण्यात आला होता. या आधी अनेकवेळा आयएसआयच्या कर्मचाऱ्यांनी अहुवालिया यांचा पाठलाग केला होता. याबद्दल भारतीय दुतवासानं चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी दुतावासात काम करणारे दोन अधिकारी हेरगिरी करताना रंगेहात पकडले. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे गौरव अहुवालिया यांना त्रास दिला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हे ही वाचा – जॉर्ज फ्लॉईड यांना झाला होता कोरोनाचा संसर्ग!