घरदेश-विदेशकोरोनामुक्तीमध्ये भारत अव्वल; आतापर्यंत ७५ लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे

कोरोनामुक्तीमध्ये भारत अव्वल; आतापर्यंत ७५ लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे

Subscribe

रोगमुक्तांच्या संख्येने आज ७५ लाखांचा आकडा (७,५४४,७९८) पार केला. संपूर्ण देशात २४ तासांमध्ये ५३,२८५ रुग्ण बरे झाल्याचे नोंदवले गेले.

जागतिक स्तरावर सर्वात जास्त रोगमुक्तांचा दर असणारा देश म्हणून भारताने आपले स्थान कायम राखले. रोगमुक्तांच्या संख्येने आज ७५ लाखांचा आकडा (७,५४४,७९८) पार केला. संपूर्ण देशात २४ तासांमध्ये ५३,२८५ रुग्ण बरे झाल्याचे नोंदवले गेले.

भारतातील सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५,६१,९०८ आहे. यातही सक्रीय रुग्णसंख्याच्या संख्येतही घट होत आहे. देशातील बाधित रूग्णांपैकी उपचार सुरू असलेले रुग्ण फक्त ६.८३ टक्के एवढेच आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत, उपचार सुरू असलेल्या रुग्णांची टक्केवारी (सक्रीय रुग्ण) तीन पटीने घटली. ३ सप्टेंबरला ही टक्केवारी २१.१६ टक्के होती. बरे होणार्‍यांच्या वाढत्या संख्येमुळे राष्ट्रीय रोगमुक्तीचा दरसुद्धा सातत्याने वाढत आहे. तो सध्या ९१.६८ टक्के आहे. गेल्या २४ तासात १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशात ७८ टक्के रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. यापैकी ७,०२५ नवीन प्रकरणे केरळमधील तर दिल्ली व महाराष्ट्र दोन्हीकडे पाच हजारपेक्षा जास्त प्रकरणे आढळून येत आहेत. केरळ व कर्नाटकात सर्वाधिक म्हणजे आठ हजार रुग्ण बरे झाले तर दिल्ली व पश्चिम बंगालमध्ये चार हजार जण बरे झाले.

- Advertisement -

जानेवारी २०२० पासून कोविड-१९ चे रुग्ण भारतात सातत्याने गणिती श्रेणीने वाढत होते. चाचण्यांच्या संख्येमधील वाढ ही आधीच्या टप्प्यावरील रोगनिदान आणि त्यानुसार उपचार यासाठी उपयुक्त ठरली. या संख्येने ११ कोटींचा (११,०७,४३,१०३) महत्वाचा टप्पा ओलांडला. राज्ये व केंद्राच्या संयुक्त प्रयत्नांनी देशात रोगनिदान केंद्रांची संख्यावाढ होत आता २०३७ रोगनिदान केंद्रे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -