सावधान!! देशात प्रदुषणाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय

देशात २०१७ या एका वर्षामध्ये जवळपास १२.४ लाख लोकांना वायु प्रदुषणामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर, कार्बन उत्सर्जनामध्ये भारत आणि चीन अव्वल स्थानी पोहोचले आहेत.

Delhi

वायु प्रदुषण!! सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी समस्या बनला आहे. वायु प्रदुषणामुळे जगभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच वायु प्रदुषणाचा विळखा आता देशाला आणखी आवळताना दिसत आहे. कारण देशात २०१७ या एका वर्षामध्ये जवळपास १२.४ लाख लोकांना वायु प्रदुषणामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. प्रत्येक ८  व्यक्तिमागे एका व्यक्तिचा मृत्यू हा वायु प्रदुषणामुळे होत आहे. दिवसेंदिवस देशातील वाय प्रदुषण वाढत असल्याची बाब देखील अाता समोर येत आहे. यातील लक्षणीय बाब म्हणजे कार्बन उत्सर्जनामध्ये भारत आणि चीन अव्वल स्थानी पोहोचले आहेत. कार्बन उत्सर्जनामध्ये भारत आणि चीन हे पहिल्या १० देशांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. दिवसेंदिवस कार्बनचं हे उत्सर्जन वाढत असल्याचं देखील अभ्यासाअंती स्पष्ट झालं आहे. कार्बन उत्सर्जनामध्ये भारत, चीन, अमेरिका, जपान, जर्मनी, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया आणि कॅनडा हे देश अग्रेसर असल्याचं देखील या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

वाढत्या वायु प्रदुषणामुळे नागरिकांना अनेक आजारांचा देखील सामना करावा लागत आहे.वायु प्रदुषमामध्ये उत्तर प्रदेश अव्वल, महाराष्ट्र दुसऱ्या तर बिहार तिसऱ्या स्थानी आहे. वाढतं वायु प्रदुषण हे देशासमोरील एक मोठं आव्हान म्हणून उभं राहिलं आहे. दरम्यान, यावर काही कडक पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

वाचा – वायु प्रदुषणाशी लढण्यासाठी या गोष्टी नक्की करा!!

वाचा – वायु प्रदुषणामुळे ९० लाख लोकांचा मृत्यू