घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी पायऱ्या चढताना पडले, व्हिडीओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी पायऱ्या चढताना पडले, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी कानपूर दौऱ्यावर होते. गंगा घाटला भेट दिल्यानंतर परतत असताना पायऱ्या चढताना अचानक मोदींचा तोल गेला आणि ते खाली पडले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कानपूरमधील राष्ट्रीय गंगा परिषदेच्या बैठकीला गेले होते. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. पायऱ्या चढत असताना मोदी पडले असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कानपूर येथील गंगा घाटच्या पायऱ्या चढत असताना नरेंद्र मोदी अचानक पडले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्यासह सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरले. सुदैवाने मोदींना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. पण, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय गंगा परिषदेत नमामि गंगे प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील आणि नवीन कृती आराखड्यावर चर्चा झाली. शिवाय, पंतप्रधानांनी गंगा नदीची केल्या जाणाऱ्या सफाईचा ही आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातील अनेक मंत्री ही उपस्थित होते.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -