घरदेश-विदेशस्विस बँकेतील ठेवींमध्ये भारत ७७व्या क्रमांकावर 

स्विस बँकेतील ठेवींमध्ये भारत ७७व्या क्रमांकावर 

Subscribe

स्विस बँकांमध्ये भारतीय नागरिक आणि कंपन्यांच्या ठेवींच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावरून ७७ स्थानावर आला आहे. स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेच्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. या यादीत ब्रिटनचा पहिला क्रमांक आहे. मागील वर्षी या यादीमध्ये भारत ७४व्या क्रमांकावर होता. स्विस नॅशनल बँक (एसएनबी) ने जाहीर केलेल्या वार्षिक बँकिंग आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की भारतीय नागरिक आणि कंपन्यांच्या ठेवींच्या बाबतीत भारत अत्यंत कमी ठिकाणी आहे. स्विस बँकांमध्ये परकीयांनी जमा केलेल्या पैशांपैकी केवळ ०.०६ टक्के भारतीयांचा वाटा आहे. त्याच वेळी २०१९ च्या अखेरीस या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणार्‍या यूके नागरिकांच्या एकूण ठेवींमध्ये २७ टक्के वाटा आहे.

एसएनबीच्या ताज्या आकडेवारीनुसार स्विस बँकांमध्ये भारतीय नागरिक आणि कंपन्यांच्या ठेवी (भारतात असलेल्या शाखेतून ठेवींसह) २०१९ मध्ये ५.८ टक्के घसरून ८९.९ करोड स्विस फ्रेंक (६,६२५ कोटी) पर्यंत खाली आले आहे.बँकांनी एसएनबीला दिलेली ही अधिकृत आकडेवारी आहे. यावरून मात्र भारतीयांच्या काळ्यापैशाची माहिती मिळत नाही, कारण यात अशा भारतीयांच्या पैशाची माहिती नाही ज्यांनी दुसऱ्या देशांमधून स्विस बँकेत पैसे ठेवले आहेत.     या यादीत ब्रिटन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अमेरिका दुसऱ्या, वेस्ट इंडीज तिसऱ्या, फ्रान्स चौथ्या आणि हाँगकाँग पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या पाच देशांमध्ये स्विस बँकांमध्ये जमा झालेल्या पैशांच्या ५० टक्क्यांहून अधिक रक्कम आहे. त्याचबरोबर पहिल्या दहा देशांचा वाटा ६६ टक्क्यांहून अधिक आहे. पहिल्या १५ देशांमध्ये या यादीतील ७५ टक्के आणि पहिल्या ३० देशांमध्ये ९० टक्के हिस्सा आहे.

- Advertisement -

पहिल्या दहा देशांमध्ये जर्मनी, लक्झेंबर्ग, बहामास, सिंगापूर आणि केमन बेटांचा समावेश आहे. केवळ २२ देश आहेत ज्यांचा स्विस बँकांमध्ये जमा झालेल्या पैशात हिस्सा एक टक्का किंवा त्याहून अधिक आहे. यामध्ये चीन, जर्सी, रशिया, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, पनामा, इटली, सायप्रस, युएई, नेदरलँड्स, जपान आणि गुर्नेसी यांचा समावेश आहे.
ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांविषयी बोलताना भारत या यादीत सर्वात खाली आहे. ब्रिक्स देशांमध्ये रशिया २० व्या क्रमांकावर आहे. २०१८ मध्ये तो त्याच ठिकाणी होता. चीनही गेल्या वर्षीप्रमाणे २२व्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका दोन स्थान पुढे येऊन ५६व्या स्थानावर आहे. ब्राझील ६२व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी तो ६५ व्या क्रमांकावर होता.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -