घरCORONA UPDATECorona Update: देशात २४ तासांत कोरोनाचे ५०० बळी!

Corona Update: देशात २४ तासांत कोरोनाचे ५०० बळी!

Subscribe

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकड्यासोबतच आता कोरोना बळींचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. देशात २४ तासांत ५०० रुग्णांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक २८ हजार ७०१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख ७८ हजार २५४वर पोहोचला असून मृतांचा आकडा २३ हजार १७४ झाला आहे. तसेच सध्या ३ लाख १ हजार ६०९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत ५ लाख ५३ हजार ४७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

सध्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात विक्रमी वाढ होताना दिसत आहे. २५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ५४ हजारांहून अधिक आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत कोरोनाचे ९२ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

१२ जुलैपर्यंत देशात १ कोटी १८ लाख ६ हजार १५६ नमुना चाचण्या झाल्या आहेत. यापैकील काल २ लाख १९ हजार १०३ नमुना चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) दिली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – कोरोननंतरच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर दणदणीत विजय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -