काश्मीर प्रश्नावरील ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला

काश्मीर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला मध्यस्ती करण्याची विनंती केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, हा दावा भारतीय परराष्ट्रीय मंत्रालयाने फेटाळला आहे.

Washington
donald trump
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये बैठक झाली. या बैठकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची विनंती केल्याचा दावा केला. परंतु, भारताने हा दावा फेटाळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशी कोणतीही विनंती अमेरिकेकडे केली नसल्याचे स्पष्टीकरण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

फक्त द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली – परराष्ट्र मंत्रालय

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे. त्यांनी ट्विटरवर यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याजवळ काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची विनंती केलेली नाही. याशिवाय काश्मीर प्रश्नावर कोणत्याही देशाची मध्यस्ती न स्वीकारण्याच्या भूमिकेवर भारत ठाम आहे.’ याशिवाय मोदींचे ट्रम्प यांच्यासोबत फक्त द्विपक्षीय संबंधावर चर्चा झाल्याचे रवीश कुमार म्हणाले.


हेही वाचा – अमेरिकेत इम्रान खान यांना दुय्यम वागणूक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here