Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर ताज्या घडामोडी देशात २४ तासांत २० हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ३७९ जणांचा मृत्यू

देशात २४ तासांत २० हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ३७९ जणांचा मृत्यू

मागील २४ तासांत देशात २० हजार ९०३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

New Delhi
Corona infection

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २० हजार ९०३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख २५ हजार ५४४ वर पोहोचली असून मृतांची संख्या १८ हजार २१३ झाली आहे. तसेच २ लाख २७ हजार ४३९ active केसेस असून ३ लाख ७९ हजार ८९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यात आज ८ हजार १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण १ लाख १ हजार १७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट हा ५४.२१ टक्के एवढा झाला आहे. तसेच आज सर्वाधिक ६ हजार ३३० नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १ लाख ८६ हजार ६२६वर पोहोचला असून ८ हजार १७८ मृतांचा आकडा झाला आहे.

मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील कोरोना रिकव्हरीचा रेट देखील वाढताना दिसत आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे आज मुंबईत ५ हजार ९०३ कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ५० हजार ६९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहेत. तसेच आज १ हजार ५५४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८० हजार २६२वर पोहोचला असून ४ हजार ६८६ मृतांचा आकडा झाला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.


हेही वाचा – खुशखबर! भारतात १५ ऑगस्ट रोजी लाँच होणार कोरोनाची पहिली लस!