घरताज्या घडामोडीचिंता वाढली! देशातील बाधितांचा आजचा आकडा धडकी भरणारा

चिंता वाढली! देशातील बाधितांचा आजचा आकडा धडकी भरणारा

Subscribe

देशात मागील २४ तासांत देशात २६ हजार ५०६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ९३ हजार ८०२ वर पोहोचली असून मृतांची संख्या २१ हजार ६०४ झाली आहे.

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २६ हजार ५०६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ९३ हजार ८०२ वर पोहोचली असून मृतांची संख्या २१ हजार ६०४ झाली आहे. तसेच २ लाख ७६ हजार ६८५ active केसेस असून ४ लाख ९५ हजार ५१३ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

राज्यात २४ तासांत ६ हजार ८७५ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली असून २१९ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ३० हजार ५९९वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी ९ हजार ६६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ टक्के एवढा आहे. तसेच २४ तासांत ४ हजार ६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १ लाख २७ हजार २५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ५५.१९ टक्के एवढा झाला आहे. तर सध्या ९३ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – ड्रॅगनचा पेगॉंगवर डोळा, फिंगर ४ वर सैनिकांची जमवाजमव


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -