Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर ताज्या घडामोडी देशात २४ तासांत २४ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ४८७ जणांचा मृत्यू

देशात २४ तासांत २४ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ४८७ जणांचा मृत्यू

मागील २४ तासांत देशात २४ हजार ८७९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे.

New Delhi
India reports the highest single-day spike of 24879 new COVID19 cases and 487 deaths in the last 24 hours
देशात २४ तासांत २४ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ४८७ जणांचा मृत्यू

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात २४ हजार ८७९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ६७ हजार २९६ वर पोहोचली असून मृतांची संख्या २१ हजार १२९ झाली आहे. तसेच २ लाख ६९ हजार ७८९ active केसेस असून ४ लाख ७६ हजार ३७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तर आतापर्यंत १ कोटी ७ लाख ४० हजार ८३२ जणांची कोविड टेस्ट करण्यात आली आहे. यापैकी २ लाख ६७ हजार ६१ जणांची बुधवारी तपासणी करण्यात आली आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ६०३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख २३ हजार ७२४वर पोहोचला असून मृतांचा आकडा ९ हजार ४४८ झाला आहे. तसेच दिलासा देणारी बाब म्हणजे २४ तासांत ४ हजार ६३४ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आतापर्यंत १ लाख २३ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट ५५.६ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात ९१ हजार ६५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – भारताकडून आलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमुळे बरं वाटतंय – ब्राझीलचे राष्ट्रपती