घरदेश-विदेशभारत-रशिया दरम्यान झाला 'हा' महत्वाचा करार

भारत-रशिया दरम्यान झाला ‘हा’ महत्वाचा करार

Subscribe

भारत-रशियादरम्यान पार पडलेल्या शिखर बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत एस-४०० वायू सुरक्षा प्रणालीवर करार करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिखर बैठकीदरम्यान आज रशियाबरोबर झालेल्या दुसऱ्या शिखर बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. आपल्या भारत भेटीदरम्यान पुतिन यांनी काही महत्वाचे करार केले आहे. यामधील एस-४०० हा वायू सुरक्षेवर आधारित करारावर आज दोन्ही देशांनी हस्ताक्षर केलं आहे. याचबरोबर स्पेस आणि उर्जा यासंदर्भातही महत्वाचे करार होणार असल्याचेही सांगण्यात आले. या करारामुळे भारत रशियातील संबध अजून मजबूत होणार आहे असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. पुतिन गुरुवारी भारतात आले होते. परराष्ट्रमंत्री सुशमा स्वराज यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर पुतिन लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानाच्या घरी गेले. यानंतर नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात बैठक झाली. पुतिन यांच्यासाठी मोदींनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यंदाची ही १९ वी शिखर बैठक आहे. या बैठकीला पूतिन यांच्याबरोबर उप प्रधानमंत्री यूरी बोरिसोव, परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव आणि उद्योगमंत्री डोनिस मंतुरोव आले होते.

काय म्हणाले मोदी?

“भारताच्या विकासाला नेहेमीच रशियाची साथ मिळाली आहे. पुतिन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमुळे आम्ही एकमेकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकलो. आमच्या मुलाखातीमुळे राजकीय क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. भारत आणि रशिया दरम्यान या करारामुळे भारताची वायू सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. एस-४०० कराराव्यतिरीक्त भारत-रशियादरम्यान एनर्जी, उद्योगां विषयीही महत्वाचे करार होतील.”

- Advertisement -

अमेरिका होऊ शकतो नाराज

रशियासोबत भारताच्या वाढत्या व्यापारामुळे अमेरिका नाराज होऊ शकतो. रशियासोबत व्यापार न करण्याचे निर्देश अमेरिकेकडून देण्यात आले होते. हे निर्देश आंतराष्ट्रीय स्तरावर इतर देशांनाही देण्यात आले होते. रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशाशी अमेरिका व्यापार करणार नसल्याचे धोरण आहे. मात्र रशियाकडून वायू सुरक्षेसाठी एस-४०० करार केल्यामुळे अमेरिकाही भारतावर नाराज होऊ शकते. या सोबतच अमेरिकाने इराणवर आर्थिक बंदी घातली आहे. इराणकडून तेल विकत घेऊन भारत अमेरिकेच्या नाराजीत भर टाकत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -