घरताज्या घडामोडीCorona गेल्यानंतरही अर्थव्यवस्थेवर परिणाम दीर्घकाळ होणार!

Corona गेल्यानंतरही अर्थव्यवस्थेवर परिणाम दीर्घकाळ होणार!

Subscribe

भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाचा गुंतवणुकीवर व क्रयशक्तीवर विपरीत परिणाम दीर्घकाळ होणार आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था तब्बल नऊ टक्क्यांनी आंकुचन पावणार असल्याचा अंदाज एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज या पतनिर्धारण संस्थेने व्यक्त केला आहे. या आधी संस्थेने भारताची अर्थव्यवस्था पाच टक्क्यांनी आकुंचन पावेल असा वर्तवला होता. परंतु कोविड-१९ च्या वाढत्या प्रदुर्भावामुळे खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीवर मर्यादा आल्याचे एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जचे आशिया पॅसिफिकचे अर्थतज्ज्ञ विश्रुत राणा यांनी सांगितले.

कोरोनाला आळा घालण्यासाठी केलेला लॉकडाइन यामुळे खासगी क्षेत्रातील एकूण खरेदीक्षमता तब्बल २६.७ टक्क्यांनी घटली, तर स्थिर गुंतवणूक ४७.१ टक्क्यांनी घसरली. परंतु समाधानकारक पावसामुळे कृषि क्षेत्रामध्ये मात्र वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या घसरणीला थोडाफार चाप बसला आहे.

- Advertisement -

जूनमध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात आले असले तरी महामारीची साथ सुरूच राहणार असल्यामुळे आर्थिक वाढीला आळा बसणार असल्याचा आमममचा अंदाज आहे. असे राणा म्हणाले. त्याचप्रमाणे जोपर्यंत कोरोनाचा धोका कायम राहील तोपर्यंत ग्राहक खर्च करताना तसेच कंपन्या गुंतवणूक करताना हात आखडता घेतील असे राणा यांनी सांगितले.

औद्योगिक व्यवहार सुरळित होत असले तरी उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच राहणार असल्यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत जीडीपीची वाढ निगेटिव्ह राहणार असल्याचा अंदाज एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने वर्तवला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘सामना’मधून संजय राऊत यांची राज ठाकरेंना साद


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -