Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE नवीन कोरोनाला आयसोलेट करणारा भारत एकमेव देश

नवीन कोरोनाला आयसोलेट करणारा भारत एकमेव देश

Related Story

- Advertisement -

ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या संक्रमणावर ताबा मिळवण्यात यश आलं आहे. भारत नव्या विषाणूला वेगळं करण्यात यशस्वी झाला आहे. असं करणार भारत एकमेव देश ठरला आहे. याबाबतची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) शनिवारी दिली. आयसीएमआरने ट्विट करत ही माहिती दिली.

आयसीएमआरने ट्वीटमध्ये दावा केला आहे की ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूला कोणत्याही देशाने यशस्वीरित्या वेगळा केलेला नाही. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूला राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेमध्ये (The National Institute of Virology) यशस्वीपणे अलग ठेवण्यात आलं आहे. यासाठीचे नमुने ब्रिटनहून परत आलेल्या लोकांकडून गोळा करण्यात आले.

- Advertisement -

२९ जणांना नव्या कोरोना विषाणूची लागण

ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूची भारतातील २९ जणांना लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची शुक्रवारी माहिती दिली. कोरोनाचा नवा विषाणू वेगात पसरतो. ७० टक्क्यांहून अधिक वेगात संक्रमण करतो.

DCGI ची ११ वाजता पत्रकार परिषद

- Advertisement -

केंद्रीय औषध मानक संस्थेच्या तज्ज्ञ समितीने डीसीजीआयकडे भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ आणि सीरम संस्थेच्या ‘कोविशिल्ड’ लसीचा आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे. अशा परिस्थितीत आता डीसीजीआय या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापरास मान्यता देईल अशी अपेक्षा आहे. आज सकाळी ११ वाजता डीसीजीआय पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. लसीकरणासाठी डीसीजीआयची परवानगी महत्त्वाची असते.

 

- Advertisement -