CoronaVirus: काही दिवसांसाठी देशभरात टोलमुक्ती!

india toll free in all india for next few days says central minister nitin gadkari
CoronaVirus: काही दिवसांसाठी देशभरात टोलमुक्ती!

करोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात टोल नाक्यावर आता टोल वसुली केला जाणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे आता देशभरात पुढचे काही दिवस टोलमाफी असणार आहे. संपूर्ण देशात पुढील काही दिवसांत टोल वसुली होणार नाही आहे. सध्या लॉकडाऊन परिस्थितीत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. त्यामुळे यासाठी अनेक वाहन किंवा जड वाहन यांची दळणवळण सुरू आहे. या वाहनांकडून कोणतीही टोल वसुली आता केली जाणार नाही आहे. तसंच टोल देताना जो वेळ जातो तो देखील आता वाचणार आहे.

याशिवाय टोल जरी घेतला जात नसला तरी रोड मेंटेनन्सची काम देखील सुरळीत सुरू राहणार आहे, असं देखील नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

 

सध्या देशभरात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या महारोगाचा संसर्ग रोखण्यासाठी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. २४ मार्च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात घोषणा केली. लॉकडाऊन दरम्यान राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसंच या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहे.


हेही वाचा – Coronavirus – फटके खाऊनही बाहेर फिरणाऱ्या नागरिकांसाठी केंद्राने जाहीर केली नियमावली!