घरदेश-विदेशमोदी-ट्रम्प मैत्रीचे दुष्परिणाम भविष्यात भारताला भोगावे लागणार!

मोदी-ट्रम्प मैत्रीचे दुष्परिणाम भविष्यात भारताला भोगावे लागणार!

Subscribe

काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी मोदी आणि ट्रम्प यांच्यावर टीका केली.     

अमेरिका ही जगातील सर्वात प्रगल्भ आणि प्रगतीशील लोकशाही मानली जाते. परंतु, नुकत्याच अमेरिकेत ज्या घटना घडल्या, त्या या देशाच्या लौकिकाला आणि प्रतिष्ठेला बाधा पोचवणाऱ्या ठरल्या. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला. डोनाल्ड ट्रम्प वादग्रस्त वक्त्यव्यांसाठी ओळखले जातातच. मात्र, आता घडलेल्या घटनेमुळे ट्रम्प यांचा बेजबाबदारपणा दिसून आला असून ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीचे दुष्परिणाम भविष्यात भारताला भोगावे लागतील, असे विधान काँग्रेस प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या बेजबाबदार व्यक्तीसाठी लाखो रुपये खर्च करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे निवडणूक प्रचारासाठी जणू एक मोठी रॅली आयोजित केली होती. निवडणुकीत उमेदवार असलेल्या दुसऱ्या राष्ट्राच्या अध्यक्षासाठी एखाद्या देशात अशी रॅली आयोजित करणे परराष्ट्र धोरणाला अनुसरुन नसते. भविष्यात ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीचे दुष्परिणाम भारताला भोगावे लागणार आहेत, असे अनंत गाडगीळ म्हणाले.

- Advertisement -

ब्रिटनच्या पंतप्रधानांना प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. आता त्यांनी त्यांचा दौरा रद्द केल्याने भारतावर नामुष्कीची वेळ आली आहे. याशिवाय भारताभोवतालच्या नेपाळ, श्रीलंका आणि भूतान या देशांमधील राजकीय घटना व चीनचा या देशांवरील वाढत चाललेला प्रभाव यामुळे मोदींच्या परराष्ट्र धोरणातील अपरिपक्वता उघड झाली असल्याची टीकाही अनंत गाडगीळ यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -