घरदेश-विदेशदहशतवादाच्या मुद्यावर भारत पाकला मदत करेल - राजनाथ सिंह

दहशतवादाच्या मुद्यावर भारत पाकला मदत करेल – राजनाथ सिंह

Subscribe

पाकिस्तानला दहशतवादाशी लढण्यासाठी भारत पूर्णपणे मदत करेल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांना दिलं आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये बोलत ते बोलत होते.

पाकिस्तानला दहशतवादाशी लढण्यासाठी भारत पूर्णपणे मदत करेल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांना दिलं आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी हे आश्वासन दिलं आहे. जर तालिबान अमेरिकेच्या मदतीनं दहशतवादाचं उच्चाटन करू शकते. तर, मग पाकिस्तान का नाही? असा सवाल देखील यावेळी राजनाथ सिंह यांनी विचारला आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी जम्मू – काश्मीरच्या मुद्यावर पाकला ठणकावलं आहे. तसेच मागील चार वर्षामध्ये दहशतवाद पूर्णपणे थांबला असा दावा आम्ही करणार नाही. पण, दहशतवादाचं प्रमाण कमी झाल्याचं यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितले. काश्मीरमध्ये पंचायत निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या याचाच अर्थ परिस्थिती सुधारत आहे असं देखील सिंह यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी आगामी काळात दहशतवाद आणि नक्षलवाद देशातून हद्दपार करू असं म्हटलं आहे.

यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला. राहुल गांधी युपीए सरकारनं देखील सर्जिकल स्ट्राईक केला असा दावा करतात. मग, त्यांनी केलेली कारवाई लपवून का ठेवली? असा सवाल केला आहे. तसंच, नक्षलवादला देखील आळा घालण्यास सरकार यशस्वी झालं असून नक्षलवादी कारवायांचं प्रमाण ९० टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुढील काही वर्षामध्ये नक्षलवाद संपवण्यास सरकार यशस्वी होईल असा दावा देखील राजनाथ सिंह यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

- Advertisement -

तसंच राजनाथ सिंह यांनी एमआयएमचे अध्यक्ष अकबरूद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. ओवेसी यांनी अल्ला मोदींचा पराभव करेल असं वक्तव्य केलं आहे. पण, ओवेसी यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही कुणाच्याही धर्माच्या आणि देवाच्या नावावर राजकारण करत नाही. आमचं राजकारण हे न्याय आणि मानवतेसाठी आहे. तसंच हिंदु धर्म हा जगण्याचा मार्ग दाखवतो असं म्हटलं आहे.

वाचा – दहशतवादावर पाकच्या उलट्या बोंबा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -