आता भारत घेणार समुद्रातील खनिजांचा शोध

आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या अनेक शोध सुरु आहेत. त्यातील सगळ्यात खर्चिक अशा अंतराळ मोहिमा आहेत. जर समुद्रातील खनिजांनी देशाला फायदा होणार असेल तर समुद्राचा अधिक अभ्यास करुन फायदा का करायचा नाही ?

Chennai
seabed-mining
भारत घेणार समुद्रातील खनिजांचा शोध

समुद्रातील खनिजांचा शोध घेत आता भारत समुद्राच्या आत खोल जाणार आहे. समुद्राच्या आत असणाऱ्या लोह, चांदी आणि सोन्याचा उपयोग पुढील काळात भारताला होणार आहे . भारताच्या आर्थिक मालमत्तेत त्यामुळे वाढ होणार आहे. समुद्राचे अभ्यासक कॅप्टन नेमो यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारतातील समुद्रसपाटीखाली शोध मोहिम आखली जाणार आहे.

वाचा- यांना मिळणार चंद्रावर उतरण्याची संधी

खनिजांचा टेक्नॉलॉजीत होणार उपयोग

समुद्राच्या तळाशी असलेली खनिजे ही अत्याधुनिक साधने बनवता येऊ शकणार आहेत. समुद्राच्या तळाशी बटाटाच्या आकारात पोलिमेटालिक नोड्युल्स आहेत. कॉपर, निकेल, कोबाल्ट, मॅगनीझ, आर्य आणि अन्य दुर्मिळ खनिजांपेतक्षा ही त्याची किंमत अधिक आहे. याचा उपयोग स्मार्टफोन्स, लॅपटॉप, हायब्रीड कार, सोलार पॅनल हे बनवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

वाचा- नासाच्या ‘इनसाईट’ या यानासोबत मंगळावर उतरले १ लाख भारतीय

चीनची देखील नजर

समुद्रातील या खनिजांचा उपयोग पाहता चीनची देखील समुद्राच्या मालमत्तेवर नजर असणार आहे. त्यामुळे ही मोहिम लवकरात लवकर आखण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या विशेष यंत्रणा आणि गाड्या तयार करण्याचे काम देखील असणार आहे.

चंद्र, मंगळ आणि आता समुद्र

आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या अनेक शोध सुरु आहेत. त्यातील सगळ्यात खर्चिक अशा अंतराळ मोहिमा आहेत. जर समुद्रातील खनिजांनी देशाला फायदा होणार असेल तर समुद्राचा अधिक अभ्यास करुन फायदा का करायचा नाही ? असे एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले. ही मोहिम इतर देशांची स्पर्धा नसून भारताला खनिजांसाठी समृद्ध करण्याची मोहिम असणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर ५हजार५०० मीटर इतक्या समुद्राच्या तळाचा शोध २०२२ पर्यंत घेण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here