अरुणाचल प्रदेशात सापडले बेपत्ता ‘एएन – ३२’ विमानाचे अवशेष

वायुसेनेच्या बेपत्ता झालेल्या 'एएन – ३२' विमानाचे काही अवशेष मंगळवारी शोध पथकास आढळून आले असून विमानाच्या अन्य भागाचा शोध घेणे सध्या सुरु आहे.

Antonov-An-32
वायुदलाचे एएन-३२ विमान

वायुसेनेच्या बेपत्ता झालेल्या एएन – ३२विमानाचे काही अवशेष मंगळवारी शोध पथकास आढळून आले आहेत. हे विमानाचे अवशेष शोध मोहिमेदरम्यान अरुणाचल प्रदेशातील लिपोच्या उत्तरीय भागात आढळून आले आहेत. तर विमानाच्या अन्य भागाचा शोध घेणे सध्या सुरु आहे. वायुसेनेचे प्रवक्ते विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी सांगितले आहे की, शोध मोहिम अजूनही सुरु आहे. मात्र, बेपत्ता विमानाचा अद्याप शोध लागलेला नाही.

असे झाले विमान बेपत्ता ?

भारतीय वायुदलाचे एएन- ३२ या विमानाने सोमवारी दुपारी आसामच्या जोरहाट एयरबेसवरुन उड्डाण घेतले होते. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्ये अरुणाचल प्रदेशच्या मेचुका एयरफील्डवरुन ते बेपत्ता झाले. हा भाग चीनच्या सीमेपासून जवळ आहे. जोरहाट एयरबेसवरुन या विमानाने सोमवारी १२ वाजून २५ मिनिटाने उड्डाण घेतले होते. त्यानंतर या विमानाचा संपर्क दुपारी १ वाजता तुटला. या विमानामध्ये ८ क्रू मेंबर आणि ५ प्रवासी असे एकूण १३ जण प्रवास करत होते.

वायुसेनेकडून शोधमोहिम युद्धपातळीवर सुरु

सध्या हवामान खराब असून देखील भारतीय वायुसेनेकडून या विमानाची शोधमोहिम युद्धपातळीवर राबवली जात आहे. हे विमान अरुणाचल प्रदेशाकडे जात असताना अचानक बेपत्ता झाले असून मागिल आठवड्यात बुधवारी वायुसेनेने या विमानाच्या शोधासाठी एसयू ३० जेट लढाऊ विमान, सी १३० जे, एमआय १७ आणि एएलएच हॅलिकॉप्टर पाठवले आहे. ही शोधमोहिम आसामच्या जोरहाट ते अरुणाचल प्रदेशच्या मेचुका अॅडव्हान्स्ड लॅण्डिंग ग्राउंड दरम्यान असलेल्या वन क्षेत्रात केली जात आहे. याशिवाय भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचे उपग्रह काटरेसॅट आणि आरआयसॅट यांच्याद्वारे देखील या भागांची छायाचित्र काढण्यात आली आहेत. तसेच वायुसेनेचे माजी हवाई अधिकारी कमांडिंग चीफ एअर मार्शल आर.डी.माथुर या शोध आणि बचाव मोहिमेला मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय इंडोतिबेट सीमा पोलीस, अरूणाचल पोलीस आणि स्थानिकांकडूनही शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.


हेही वाचा – हवाई सुरक्षा शुल्कात १ जुलैपासून वाढ; विमान प्रवास महागणार

हेही वाचा – इस्त्रोचा उपग्रह घेणार बेपत्ता एएन- ३२ विमानाच्या शोध