घरदेश-विदेशचीनला इशारा! LAC वर हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे एअर ऑपरेशन

चीनला इशारा! LAC वर हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे एअर ऑपरेशन

Subscribe

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर एलएसी तणाव निर्माण करणाऱ्या चीनला भारतीय हवाई दलाने इशारा दिला आहे. हवाई दलाने सीमेवर आपल्या हालचालींना अधिक वेग दिला असून हवाई दलाने सीमेवर आधीच आपले लढाऊ विमान सीमेला लागून असलेल्या तळावंर तैनात केले आहेत. आता हवाई दलाच्या सुखोई Su-30MKI आणि मिग – २९ या लढाऊ विमानांसोबत अपाचे हेलिकॉप्टरही सीमेवर उडताना दिसून येत आहेत. भारतीय सैन्याकडून चीन सीमेवर एअर ऑपरेशन करण्यात येत आहे.

- Advertisement -

चीनच्या विरोधात सीमेवर भारताने आपले लढाऊ विमान तैनात केले आहेत. सीमेवर मिग, सुखोई आणि हरक्युलीस विमान आधीच तैनात करण्यात आलेत. पण आता ही विमाने आणि हेलिकॉप्टर्स उडताना दिसत आहेत. कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश सैन्याच्या तिन्ही दलांना देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हे लढाऊ हेलिकॉप्टर आहे. अमेरिकेतील बोइंग कंपनीने हे हेलिकॉप्टर तयार केले असून या हेलिकॉप्टरचे वजन जवळपास ६ हजार ८३८ किलोग्रॅम इतके असते. तसेच २७९ प्रतितास वेगाने हे हेलिकॉप्टर उडू शकते. यात दोन टर्बोशाफ्ट इंजिन आहेत. या हेलिकॉप्टवर हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र, रॉकेट आणि गन मशिन असते. हेलिकॉप्टरची उंची १५.२४ फूट तर तर पंख्यांची लांबी १७.१५ फूट इतकी असते.

- Advertisement -

हेही वाचा –

ऐकावं ते नवलच! हा अब्जाधीश वयाच्या ८९ वर्षी झाला ‘बाबा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -