लडाखच्या सीमेवर भारतीय जवानांसाठी स्पेशल घरांची उभारणी

या घरांमध्ये वीज, पाणी, हिटरची सुविधा करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोग्य आणि हायजिनवरही योग्य लक्ष देण्यात आले आहे.

indian army establishes living facilities for all troops deployed in eastern ladakh
लडाखच्या सीमेवर भारतीय जवानांसाठी स्पेशल घरांची उभारणी

भारतात हिवाळ्याला सुरूवात झाली आहे. चीनशी दोन हात करणाऱ्या हजारो भारतीय सैनिकांसाठी आधुनिक घरांची उभारणी करण्यात आली आहे. एलओसीवर ( line of actual control ) चिनी सैनिकांच्या घूसखोरीला रोखण्यासाठी हजारो सैनिकांचा ताफा तिथे हजर असतो. हिवाळ्याच्या दिवसात लडाखमधील वातावरण उच्चांक गाठते. हिवाळ्यात चीनी सैनिक आणि थंडी पासून बचाव करण्यासाठी या स्पेशल घरांची उभारणी करण्यात आली आहे.

पूर्व लडाखमध्ये भारतीय सैनिक ज्या ठिकाणी आपले काम करत असतात त्या ठिकाणचे तापमान हे -४० डिग्री सेल्सियस पर्यंत जाऊ शकते. त्याचबरोबर सर्वात उंच भागात ३० ते ४० फुटापर्यत बर्फ पडण्याची शक्यता ही असते. तिथल्या अधिकाऱ्यांकडून असे सांगण्यात आले आहे की, वर्षानुवर्षे असलेल्या व्यवस्थेत स्मार्ट कॅम्पचा समावेश असतो. त्याशिवाय आधुनिक निवासी संस्थाही तयार करण्यात आल्या आहे. ज्यात अत्यावश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. या घरांमध्ये वीज, पाणी, हिटरची सुविधा करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोग्य आणि हायजिनवरही योग्य लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे आता सैनिक लढाईसाठी पूर्णपणे सज्ज आहेत. त्यांना आता कोणत्याही गोष्टींची कमतरता नाही.

भारतीय सैन्याच्या मदतीसाठी तयार करण्यात आलेल्या या नवीन इन्फ्रास्ट्रक्चरचे काही फोटो पहायला मिळत आहेत. भारत – चीन सीमेवर नेहमीच तणावाचे वातावरण पहायला मिळते. भारत आणि चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोनही सैन्याच्या कमांडर्समध्ये चर्चा होत असतात. पण त्यांच्या भूमिकेत अद्याप कोणताच बदल झालेला नाही.

तिथल्या इतर अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, लडाखच्या सीमेवर तैनात केलेल्या सैनिकांच्या तंबूमध्ये गरम वातावरण राहिल याची सोय करण्यात आली आहे. LOC वर तैनात असलेल्या सैनिकांच्या लॉजेस्टिक सपोर्टसाठी भारताने खूप प्रयत्न केले आहेत. यासाठी भारताने अमेरिकेहून गरम कपडेही मागवले आहेत. त्याचबरोबर भारताने अमेरिकेकडून १५ हजारहून अधिक एक्सटेडेंट वेदर क्लोथिंक सिस्टिम आयात केली आहे.

भारतीय सैन्य आणि पीएलए ( People’s Liberation Army) यांच्यात एलओसी होणारा तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू आहेत. ६ नोव्हेंबरला केलेल्या चर्चेत दोन्ही पक्षाने असे ठरवले आहे की, इथून पुढे सैनिकांनी सयंम ठेवला पाहिजे, गैरसमज करून चुकीची समजूत करून घेणे टाळले पाहिजे.


हेही वाचा – Maratha Reservation: घटनापीठासाठी राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयात चौथा अर्ज