घरदेश-विदेशअरे देवा! हे काय? पैशांच्या अभावामुळे सैन्यातील अधिकाऱ्यांचे भत्ते थांबवले

अरे देवा! हे काय? पैशांच्या अभावामुळे सैन्यातील अधिकाऱ्यांचे भत्ते थांबवले

Subscribe

पैशांच्या अभावामुळे सैन्यातील अधिकाऱ्यांचे भत्ते थांबवण्यात आले आहेत. भारतीय सैन्याकडे पुरेसा निधी नाही, त्यामुळे जवानांचे भत्ते थांबवण्यात आले आहेत, असे भारतीय सैन्याकडून सांगण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी केंद्रिय प्रभारी मंत्री पियुष गोयल यांनी संसदेमध्ये अंतरीम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये लष्करासाठी सर्वाधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी केंद्र सरकारकडून संरक्षण खात्यासाठी ३ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, तरीही लष्करातील अधिकाऱ्यांचे भत्ते थांबवण्यात आले आहे. लष्कराजवळ पुरेसा पैसा नसल्याकारणाने भत्ते थांबण्यात आल्याचे म्हटले गेले आहे. परंतु, मोदी सरकारकडून लष्करासाठी सर्वाधिक पैशांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातही मोदी सरकारने २ लाख ९५ हजार कोटी रुपयांची तरतूद लष्करासाठी केली होती. परंतु, तरीही सैनिकांचा भत्ता का थांबवण्यात आला? हा प्रश्न पडला आहे.

हेही वाचा – Budget 2019: अर्थसंकल्प रद्द करण्याची मागणी, न्यायालयात याचिका

- Advertisement -

अधिकाऱ्यांचा ‘हा’ भत्ता थांबवण्यात आला

भारतीय सैन्याकडे सैन्यातील अधिकाऱ्यांना देण्यासाठी पुरेसा निधी नाही. त्यामुळे सैन्यातील अधिकाऱ्यांना ट्रेनिंग आणि टूरसाठी दिले जाणारे भत्ते थांबवण्यात आले आहेत. ही माहिती सैन्याच्या अकाऊंट विभागाद्वारे वेबसाईटवर देण्यात आली आहे. प्रिंसिपल कॉम्पट्रोलर ऑफ डिफेंस अकाउंट्सच्या पोस्टमध्ये याविषयीचा उल्लेख करण्यात आला आहे. निधीच्या कमतरतेमुळे ट्रॅव्हेलिंग अलाऊंस आणि डीए डियरनेस अलाऊंस सध्या दिले जाणार नसल्याचे म्हटले गेले आहे. मात्र, जेव्हा निधी उपलब्ध होईल, तेव्हा भत्ते दिले जातील, असे त्यात स्पष्ट केले गेले आहे. दरम्यान, वेबसाईटवर भत्त्यासंबंधित प्रसिद्ध करण्यात आलेल्या या माहितेमुळे सैन्यदलाची प्रतिमा खराव होत असल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.


हेही वाचा – बजेटने शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे – अजित नवले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -