घरदेश-विदेशVideo: लंडनमध्ये भारतीय मुलाची 'स्वरजादू'

Video: लंडनमध्ये भारतीय मुलाची ‘स्वरजादू’

Subscribe

लंडनच्या रिअॅलिटी शोमध्ये एका भारतीय मुलाने, हार्मोनियमच्या सुरांवर हिंदी आणि इंग्रजी गाण्यांचे अप्रतिम फ्युजन सादर केले.

पाश्चिमात्त्य देशांमध्ये भारतीय संगतीची क्रेझ गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यातही परदेशी लोकांना भारतीतल शास्त्रीय संगीताची अधिक ओढ आहे. आजवर सातत्याने अनेक भारतीय गीतकार आणि संगीतकारांनी, त्यांच्या सुरेल आवाजाचा आणि सुमधुर संगीताचा परदेशी लोकांवर प्रभाव पाडला आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक छोटा ‘संगीत स्टार’ चांगलाच गाजतो आहे. लंडनच्या एका रिअॅलीटी शोमध्ये या भारतीय लहानग्याने आपल्या संगीताची आणि स्वरांची छाप पाडली आहे. कृष्णा असं या १० वर्षीय मुलाचं नाव असून, त्याने हार्मोनियमवर हिंदी आणि इंग्रजी गाण्यांचं अप्रतिम फ्युजन केलं आहे. कृष्णाच्या या अनोख्या प्रयोगाचं रिअॅलिटी शोच्या परिक्षकांकडून भपरभरुन कौतुक करण्यात आलं. सध्या याचा व्हिडिओ सोशल मिडियावर झपट्याने व्हायरल होत आहे. जगभरातील संगीतप्रेमी कृष्णाच्या टॅलेंटचं भरभरुन कौतुक करत आहेत. तुम्हाही पाहा, या आगळ्या-वेगळ्या फ्युजनची झलक :

व्हिडिओ सौजन्य- itv

- Advertisement -

‘फ्युजन’ ची जादू 

‘द व्हॉईल किड्स युके- २०१८’ या लंडनमधील प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये कृष्णाने त्याच्या स्वरांनी सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले. यावेळी त्याने ‘बलम पिचकारी’ या हिंदी आणि ‘हाऊ डीप इज यूअर लव’ या इंग्रजी गाण्याचं फ्युजन सादर केलं. कृष्णाने या दोन भिन्न भाषिक गाण्यांची केलेली सुरेल गुंफण, शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांना आणि जजेसना खूपच आवडली. तिनही जजेसनी कृष्णाचे भरभरुन कौतुक केले. कृष्णाची हार्मोनियमवरही खूप छान पकड असल्याचे या परफॉर्मन्समधून दिसून आले. शोच्या पुढील फेरीतही कृष्णाने त्याच्या हार्मोनियमवर ‘समथिंग जस्ट लाईक धिस’ हे गाणं सादर केलं. कृष्णाची ही अचिव्हमेंट भारतीयांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -