घरदेश-विदेशआचाऱ्याची लाचारी; पैशांसाठी बनला पाकिस्तानचा हेर

आचाऱ्याची लाचारी; पैशांसाठी बनला पाकिस्तानचा हेर

Subscribe

पाकिस्तानात भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरी असणाऱ्या स्वयंपाकीला हेरगिरीच्या नावाखाली (आरोपाखाली) अटक करण्यात आली आहे. रमेश सिंह वय ३५ वर्षे असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. हेरगिरी करून मिळालेली माहिती रमेश पैशाच्या बदल्यात आयएसआयला पुरवायचा. लष्करी गुप्तचर यंत्रणा, उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक, आणि उत्तराखंड पोलिसांनी मंगळवारी रात्री रमेशला गराली या गावातून अटक केली आहे. रमेश २०१५ ते २०१७ याकाळात राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरात स्वयंपाकी म्हणून काम करत होता.

हायटेक हेरगिरी

- Advertisement -

स्वयंपाकी म्हणून भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याकडे काम सुरू केल्यानंतर रमेश आयएसआयच्या संपर्कात आला. त्यानंतर तो पैशांच्या मोबदल्यात आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला गोपनीय माहिती पुरवू लागला. त्यासाठी तो मायक्रोफोनचा वापर करू लागला. रमेशने एक डायरी आणि काही गोपनीय कागदपत्रे देखील आयएसआयला दिली आहेत. पोलिसांनी रमेशकडून मायक्रोफोन आणि लॅपटॉप हस्तगत केले आहे. पाकिस्तानी राजदूतातले काही अधिकारी देखील रमेशच्या संपर्कात होते. अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी आनंद कुमार यांनी दिली आहे.शिवाय भारतीय लष्कराबद्दल देखील आयएसआय रमेश कडून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आनंद कुमार यांनी दिली. अटक केल्यानंतर त्याला पिथोरगड न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर लखनऊला उलट तपासणीसाठी नेण्यात आले आहे. आत्तापर्यत रमेशने त्याच्या बँक अकाऊंटमधून ८ ते ९ लाख रूपये काढले आणि कर्जाची परतफेड केली. शिवाय त्याला हेरगिरीच्या कामासाठी जास्त पैसे मिळाले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काय आहे रमेश सिंहची पार्श्वभूमि?

- Advertisement -

रमेश सिंह हा मुळचा उत्तराखंडमधील पिथोरगडचा रहिवाशी आहे. पाकिस्तानात स्वयंपाकी म्हणून काम करण्याचा सल्ला त्याला एका नातेवाईकाने दिला. त्यानंतर तो २०१५ ते २०१७ या काळात राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करू लागला. याच दरम्यान तो आयएसआयच्या संपर्कात आला. रमेशचा मोठा भाऊ भारतीय लष्करात आहे.

आयएसआय आहे तरी काय?

आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आहे. भारतासह इतर देशांमध्ये हेरगिरी करून माहिती मिळवणे हे काम ही संस्था करते. त्यासाठी एजंट नेमणे त्यांच्याकडून पैशांच्या मोबदल्यात अंत्यत गुप्त अशी माहिती मिळवण्याचे काम ही संस्था करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -