Pulwama हल्ल्यावर भारतीय क्रिकेटर्स म्हणतात…

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, व्ही.व्ही.एस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग अशा अनेक क्रिकेटर्सनी आपल्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्या आहेत.

Mumbai
indian cricketer's reaction on Pulwama terror attack

गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे. जवळपास ४४ भारतीय जवानांनी या हल्ल्यात आपले प्राण गमावले असून, देशभरातील लोक या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आदी राजकीय नेत्यांपासून ते अनेक बॉलीवूड कलाकारांपर्यंत, सर्वांनीच पुलवामामधील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. दरम्यान, या अत्यंत संवेदनशील घटनेबाबत भारतीय क्रिकेटपटूंनीही सोशल मीडियद्वारे आपले मत नोंदवले आहे. ‘दहशतवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या जवानांच्या कुटुबियांना या दु:खातून बाहेर पडण्याची ताकद मिळो… तसंच या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध आहे…’ अशा आशयाच्या प्रतिक्रिया ट्वीटरद्वारे मांडण्यात आल्या आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, व्ही.व्ही.एस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग अशा अनेक क्रिकेटर्सनी आपल्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्या आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here