सॅनिटायझरला स्पर्श न करता हात करा स्वच्छ, भारतीय विद्यार्थ्यांनी बनवला रोबोट सॅनिटायझर

mumbai

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सॅनिटायझरने सतत हात स्वच्छ धुण्याचा सल्ला जगभरातील डॉक्टर देत आहेत. त्यातही ६० टक्के अल्कोहोल ज्यात असेल असे सॅनिटायझर वापरण्यास सांगण्यात येत आहे. पण अनेक ठिकाणी एकच सॅनिटायझर एनेकजण वापरताना दिसत आहे. यामुळे सॅनिटायझरच्या बाटलीला अनेकजणांचा स्पर्शही होतो. ही पद्धत सुरक्षित नसल्याचा दावा दुबईतील एका विद्यार्थ्याने केला असून त्याने व त्याच्या मित्रांनी चक्क रोबोट सेनिटायझर तयार केला आहे. सिद्ध संघवी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

हा रोबोट तुमच्यापासून ०.५ सेंटीमीटर अंतरावरून तुमचा हात सॅनिटाईझ करतो. ज्यामुळे सॅनिटायझरच्या बाटलीला स्पर्श न करताही तुमचा हात स्वच्छ होतो. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यताही नसते. करोना व्हायरस संबंधी व्हिडीओ बघत असताना सिद्धच्या आईने त्याला एक व्हिडीओ दाखवला. ज्यात अनेकजण एकाच बाटलीतील सॅनिटायझरने हात स्वच्छ करत आहेत. पण त्यासाठी त्यांना बाटलीला स्पर्श करावा लागत आहे. ज्यामुळे संसर्ग वाढण्याचाच अधिक धोका असल्याचे सिद्धच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने रोबोट सेनिटायझर बनवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here