घरताज्या घडामोडीतीन पोरांच्या बापाने 'इंडियन आयडल'ला पळवलं

तीन पोरांच्या बापाने ‘इंडियन आयडल’ला पळवलं

Subscribe

राजस्थानातील अलवार येथे राहणाऱ्या इंडियन आयडल फेम २३ वर्षाच्या सिंगरला पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत सिंगरच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राजस्थानमधील या सिंगरने २०१८ मध्ये इंडियन आयडल या ट्विव्ही शोमध्ये सहभाग घेतला होता.

आरोपी तरुण या सिंगरला तबला शिकवायचा. हा आरोपी भरतपूर जिल्ह्यातील नगरमधील राहणारा असल्याची माहिती सिंगरच्या कुटुंबियांनी दिली. सिंगरच्या वडिलांच्या सांगण्यावरून आरोपी रोज तबला शिकवण्यासाठी घरी येत होता. वडिलांनी फुस लावून तिला पळवून नेल्याचा आरोप करत अलवर महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

महिला ठाण्याचे प्रभारी चौथमल यांनी सांगितले की, अलवरमधील एका व्यक्तीने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची मुलगी सिंगर आहे आणि तिने इंडियन आयडल स्पर्धेत भाग घेतला होता. भरतपूरचा रहिवासी असलेल्या मास्तर तीन वर्षांपासून सिंगरच्या घरी जाऊन तबला शिकवण्याचे काम करत होता. तो तीन मुलांचा बाप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी रात्री ९ वाजता तबला मास्तरने सिंगरला फुस लावून पळवले आहे. सिंगरचे दोन्ही मोबाईल बंद असून हे दोन्ही नंबर सायबर सेलकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. यामुळे लोकेशन ट्रेस केले जाणार आहे. सिंगर सापडल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सिंगर आणि आरोप दोघेही प्रौढ आहेत. ठाणा प्रभारी चौथमल यांनी सांगितले की, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जात आहे आणि सिंगरचा देखील शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तरुणाचा खून; शरीराचे तुकडे दोन गोण्यांत भरुन फेकले नदीत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -