इसिसचा अधिकारीच हिजबुल दहशतवादी संघटनेचा प्रमुख

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आणि दहशतवादी संघटनांनी मिळून कारावया केल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. भारतीय गुप्तचर संस्थेंच्या हातात काही पाकिस्ताचे कागदपत्रे लागली आहेत. यात हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन हा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयचा अधिकारी असल्याचे सांगण्यात आले आहे. या कागदपत्रांमुळे त्याला पाकिस्तानमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय कुठेही फिरता येत होते. टाईम्स ऑफ इंडियामध्ये दिलेल्या वृत्तानुसार, ही कागदपत्रे गुप्तचर विभागाने प्रकाशित केली आहेत.

काय म्हटले आहे या कागदपत्रात

मोहम्मद युसुफ शाह उर्फ सय्यद सलाहुद्दीन आयएसआयचा अधिकारी आहे. त्याच्या वाहनाला सुरक्षा तपासणीसाठी कोठेही जाण्याची गरज नाही. हे पत्र आयसआयचे संचालक वजाहत अली खान यांनी काढले होते. याची वैधता डिसेंबर २०२० पर्यंत आहे. हे पत्र अशावेळी समोर आले आहे. जेव्हा हिजबुल मुजाहिद्दीन भारतात आपली पाळंमुळं पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय सैन्याने शनिवारी प्रेस कॉन्फरन्समध्ये याबाबत माहिती दिली होती. उत्तर काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन संघटना सक्रीय झालेली दिसत आहे. या भागात हिजबुल आपला बेस तयार करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करत असल्याचे यावरुन दिसत आहे, अशी माहिती सैन्याने दिली आहे.

भारतीय गुप्तचर संस्थांनी हा मोठा पुरावा असल्याचे सांगितले आहे. यामुळे आयएसआयचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे स्पष्ट होत आहे. आयएसआय दहशतवादी संघटनांसोबत मिळूनच भारतात घातपात करत असल्याचाही आरोप यामुळे होत आहे. भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी या संघटनांना आयएसआयकडून निधी मिळतो. सलाहुद्दीन हिजबुलसोबतच यूनाटेड जिहाद काउंसिलचाही प्रमुख आहे. ही लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित संघटना आहे.

हेही वाचा –

Unlock मुळेच संसर्ग वाढतोय – राजेश टोपे