घरताज्या घडामोडीभारतीयाला पाच महिन्याची शिक्षा, क्वारनटाईन नियमांचा भंग केला, डझनभरांना कोरोना दिला

भारतीयाला पाच महिन्याची शिक्षा, क्वारनटाईन नियमांचा भंग केला, डझनभरांना कोरोना दिला

Subscribe

मलेशियातील एका न्यायालयाने भारतीय नागरिकाला (५७) क्वारनटाईनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी व्यक्तीला क्वारनटाईन नियमांचे भंग करण्याबरोबरच डझनभर लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले असून दंडही ठोठावण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती रुग्णालयात दाखल असल्याने वार्डातच न्यायालय भरवण्यात आले होते.

येथील स्थानिक वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे. संबंधित व्यक्तीचे येथील उत्तर राज्यातील केडाह येथे हॉटेल आहे. कोरोनाचा संसर्ग वाढताच मलेशियात मार्च मध्ये लॉकडाऊन करण्यात आले. पण मे महिन्यात कडक अटी व शर्थींवर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. यादरम्यान,संबंधित व्यक्तीची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती. पण त्याला चौदा दिवस क्वारनटाईन करण्यात आले. यावेळेत तो अनेकवेळा नियम मोडून हॉटेलमध्ये ये जा करत होता. अनेकांना भेटत होता. चौदा दिवसांनंतर त्याचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. त्यानंतर त्याने क्वारनटाईन असताना आपण अनेकांना भेटल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यामुळे सगळेच हादरले. तपासणी केली असता संबंधित व्यक्तीच्या संपर्कात ४५ हून जास्त लोक आल्याचे समोर आले. यामुळे क्वारनटाईन नियमांचे उल्लंघन करत संसर्ग पसरवल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवत पाच महिन्याची शिक्षा व दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -