घरदेश-विदेशआखाती देशामध्ये तब्बल २८ हजार भारतीयांचा मृत्यू

आखाती देशामध्ये तब्बल २८ हजार भारतीयांचा मृत्यू

Subscribe

लोकसभेमध्ये भारतीयांच्या मृत्यू दराचा आकडा समोर आला असून आखाती देशामध्ये तब्बल २८ हजार ५२३ भारतीयांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

लोकसभेमध्ये भारतीयांच्या मृत्यू दराचा आकडा समोर आला असून आखाती देशामध्ये तब्बल २८ हजार ५२३ भारतीयांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये यूएई, बर्हेन, कुवेत, ओमन, कतार आणि सौदी अरेबिया या आखाती देशांचा समावेश आहे. हा आकडा गेल्या चार वर्षातील मृत्यूदराचा आहे, अशी माहिती बुधवार, १२ डिसेंबर रोजी लोकसभेत देण्यात आली.

सर्वाधिक मृत्यू सौदी अरेबियामध्ये

भारतीयांचे सर्वाधिक मृत्यूची नोंद सौदी अरेबियामध्ये झाली असून २०१४- २०१८ या कालावधीत तब्बल १२ हजार ८२८ भारतीयांचे मृतू या शहरात झाले आहेत. तर यूएईमध्ये हा आकडा ७ हजार ८७७ इतका आहे. यासंबंधी परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंग यांनी लोकसभेत ही माहिती दिली. बर्हेनमध्ये २०१४ – २०१८ या कालावधीत १ हजार ०२१ भारतीयांच्या मृत्यूची नोंद झाली असून कुवेतमध्ये हा आकडा २ हजार ९३२ इतका आहे. तर ओमनमध्ये २ हजार ५६४ आणि कतारमध्ये १ हजार ३०१ इतक्या भारतीयांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असेही सिंग यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

तेथील कामगारांमध्ये जनजागृती करावी

पुढे सिंग म्हणाले की, तेथील सर्वाधिक मृत्यू हे कामगारांचे झाले असून काहींनी आत्महत्या तर काहींचे अपघात झाल्याची नोंद आहे. त्यांच्या वाढत्या मृत्यू दराकडे पाहता तिथे जनजागृतीच्या मोहिमेची नितांत गरज असल्याचे सिंग यांनी सांगितले. त्यासाठी प्रवासी भारतीय केंद्र हे कॅम्पेन राबवण्यात आले असून यंदाचा हा सर्वाधिक मृत्यूचा आकडा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -