घरदेश-विदेशयुकेमधील भारतीयांच्या घरात सर्वाधिक होते सोन्याची चोरी

युकेमधील भारतीयांच्या घरात सर्वाधिक होते सोन्याची चोरी

Subscribe

युनायटेड किंगडम (युके) मध्ये वास्तव्य करत असलेल्या भारतीय नागिरकांच्या घरातील सोने चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील पाच वर्षात तब्बल २८ हजार भारतीय नागरिकांच्या घारतून सोन्याची चोरी झाली आहे.

सोने हे बहुमुल्य असते. सोन्याचा वापर अनेक धार्मिक विधींमध्ये केला जातो. भारतीय नागरिक पूर्वापार पासून जपलेले सोने घरी ठेवतात. मात्र हे सोने घरी ठेवणे युकेतील भारतीयांना महाग पडलं आहे. युकेतील भारतीयांच्या घरावर दरडे घालणाऱ्या चोरांनी सोन्यावर डल्ला मारल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. मागील काही वर्षांमध्ये घरावर दरोडे टाकणाऱ्या चोरांनी भारतीयांच्या घरातून एकूण १४० मिलीयन पाऊंड किमतीचे सोने चोरले आहे. यामध्ये मोठ्या प्रमामावर दागिण्यांच्या समावेश आहे. मागील वर्षांमध्ये घरफोडीच्या २८ घटना घडल्या आहेत यामध्ये अधिकतः भारतीयांचा समावेश आहे. ब्रिटन पोलिसांनी ही माहिती दिली असल्यामुळे आता युकेतील भारतीयांना सोने जपने महाग पडले आहे. दरम्यान पोलिसांनी चोरीच्या घटनेची नोंद केली असून तपास सुरु असल्याचे सांगितले आहे.

वडिलोपार्जित सोन्याची चोरी

ब्रिटेनमधील वडिलोपार्जित मालमत्ता म्हणून सोने घरात जपून ठेवतात. देशाच्या चलनाची किंमत कमी जास्त होत असते. अशात सोन्याची किंमत ही सर्व देशांमध्ये सारखी राहते. वल्ड बँकमध्ये देशातील चलना ऐवजी सोन्याला अधिक मान्यता दिली जाते. स्काटलंड पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे भारतीय सणाच्या दरम्यान घरफोडीच्या घटना वाढतात. सनानिमित्त सोने विकत घेणाऱ्या भारतीयांच्या घरात सोने विकत घेतले जाते. यामुळे अनेकदा चोरीच्या घटना होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -