समलैंगिक पार्टनरसोबत राहण्यासाठी पत्नीची हत्या

उत्तरी इंग्लंडच्या मिडलबरो शहरात राहणाऱ्या भारतीयवंशाच्या मितेश पटेल याला कोर्टाने त्याची पत्नी जेसिकाच्या हत्येप्रकरणी दोषी असल्याचा निर्णय दिला आहे.

Mumbai
jessica-patel-facebook_
जेसिका आणि मितेश (सौजन्य-फेसबुक)

उत्तर इंग्लंडच्या मिडलबरो शहरात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या मितेश पटेल (वय ३७) याला कोर्टाने त्याची पत्नी जेसिकाच्या (वय ३४) हत्येप्रकरणी दोषी ठरवलं आहे. या वर्षी मे महिन्यात जेसिकाची हत्या झाली होती. त्या प्रकरणी पती मितेशला पोलिसांनी अटक केली होती. प्रकरणाची सुनावणी गेल्या महिन्यात सुरु झाली असून मंगळवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने मितेशला दोषी ठरवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मितेशला त्याच्या बॉयफ्रेंडसोबत राहायचे होते. समलैंगिक पार्टनरसोबत राहण्यासाठी मितेशने पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

जोडीदारासोबत राहता यावे ही इच्छा

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या समलैंगिक जोडीदारासोबत राहता यावे यासाठी मितेशने जेसिकाची हत्या केली. मितेशच्या आयफोनमधील हेल्थ अॅपमुळे त्याचा हा गुन्हा समोर आला. हा अॅप महत्त्वाचा पुरावा ठरला असून मितेशने चोरट्यांनी पत्नीची हत्या केल्याचा कांगावा केला होता. सुरुवातीला मितेशने घरात चोरटे घुसल्याचा कांगावा केला होता. हे सर्व खरे वाटावे यासाठी त्याने घरातील कपाटातील कपडे बाहेर काढून फेकले होते. पण मोबाईलमधील हेल्थ अॅपने त्याचे हे बिंग फोडले.

पत्नीलाही पतीच्या समलैंगिकतेची कल्पना 

सहा वर्षांपूर्वी लग्न झालेले हे जोडपं फार्मासिस्ट म्हणून काम करायचे. पण मितेश वैवाहिक आयुष्यात आनंदी नव्हता. तो समलैंगिक होता. मात्र, दबावापोटी त्याने जेसिकाशी लग्न केले होते. लग्नानंतरही मितेशचे डेटिंग अॅपद्वारे अनेक पुरुषांच्या संपर्कात होता. यातील काही जण त्याच्या घरी देखील आले होते. यादरम्यानच्या काळात मितेश डॉ. अमित पटेलच्या संपर्कात आला. अमित कालांतराने ऑस्ट्रेलियातील सिडनीत राहायला गेला. मितेशलाही अमितसोबत सिडनीत राहायचे होते. यासाठी त्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला. जेसिकाला मितेशच्या समलैंगिक संबंधांची माहिती होती. मात्र तिनेही कधीच याची बाहेर वाच्यता केली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here