घरCORONA UPDATEमहाराष्ट्रापेक्षा गुजरातला मिळाल्या जास्त श्रमिक ट्रेन

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला मिळाल्या जास्त श्रमिक ट्रेन

Subscribe

स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी परतण्यासाठी तिसऱ्या लॉकडाऊनच्या काळात श्रमिक ट्रेनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. त्याआधीच हजारो कामगारांनी पायी चालत आपल्या गावाची वाट धरली होती. मात्र सध्या श्रमिक ट्रेनच्या आकडेवारीवरून गुजरात राज्यातून सर्वाधिक ट्रेन सुटल्या असल्याचे समोर आले आहे. तर सर्वाधिक लोकसंख्या आणि मजुरांची लाखोंनी संख्या असलेल्या महाराष्ट्रातून मात्र गुजरातपेक्षा कितीतरी कमी ट्रेन सुटल्या आहेत. एबीपी माझा या संकतेस्थळाने ही तफावत समोर आणली असून आता श्रमिक ट्रेनवरुन राजकारण तरी होत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारतातील सर्वाधिक ८५३ श्रमिक ट्रेन या गुजरातमधून सुटलेल्या आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा. राज्यातून आतापर्यंत ५५० ट्रेन सुटलेल्या आहे. दोन्ही आकड्यांची तुलना केल्यास महाराष्ट्रापेक्षा गुजरातला ३०३ ट्रेन अधिक मिळाल्याचे दिसून येते. खरंतर गुजरातची लोकसंख्या ही ६.२ कोटी आहे, त्यापेक्षा दुप्पट म्हणजेच १२ कोटीहून अधिक महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. तसेच महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या टप्प्यात लाखो परप्रांतीय मजूर काम करतात. तरिदेखील महाराष्ट्रापेक्षा गुजरातला अधिक ट्रेन दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

भारतात २५ मे पर्यंत ३०६० श्रमिक विशेष रेल्वे सोडण्यात आलेल्या आहेत. १ मे पासून या विशेष रेल्वेची योजना सुरु करण्यात आली होती. २५ दिवसांत ४० लाख मजुरांना त्यांच्या इच्छित राज्यात सोडल्याचे रेल्वेने सांगितले आहे. महाराष्ट्रात मात्र ट्रेन सोडण्यावरुन राजकारण सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रेल्वे मंत्रालयावर आरोप करत आम्हाला पुरेशा रेल्वे दिल्या नसल्याचा आरोप केला. तर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील रात्री २ वाजेपर्यंत आम्ही ट्रेन द्यायला तयार आहोत, तुम्ही कामगारांची यादी द्या, असा धोशा लावला.

सर्वाधिक सुटलेले राज्य

गुजरात – ८५३

- Advertisement -

महाराष्ट्र – ५५०

पंजाब – ३३३

उत्तर प्रदेश – २२१

दिल्ली – १८१

सर्वाधिक ट्रेन पोहोचलेले राज्य

उत्तर प्रदेश – १२४५
बिहार – ८४६
झारखंड – १२३
मध्य प्रदेश – ११२
ओडिशा – ७३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -