घरदेश-विदेशएकट्या तरुणीसाठी राजधानी एक्सप्रेस धावली; भारतात पहिल्यांदाच घडले

एकट्या तरुणीसाठी राजधानी एक्सप्रेस धावली; भारतात पहिल्यांदाच घडले

Subscribe

भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकट्या प्रवाशाला घरी पोहोचवण्यासाठी Rajdhani Express तब्बल ५३५ किमी धावली आहे. “मी जाईन तर फक्त राजधानी एक्स्प्रेसनेच जाईन, जर मला बसनेच जायचं असतं तर मग रेल्वेचं तिकीट का काढलं असतं?” अनन्याच्या या जिद्दीपुढे रेल्वेला एका प्रवाश्यासाठी तब्बल ५३५ किमी ट्रेन चालवावी लागली. अनन्याच्या या जिद्दीपुढे रेल्वे अधिकारीही झुकले आणि तिला राजधानी एक्सप्रेसनेच दुपारी डाल्टनगंजहून व्हाया गया, गोमो आणि बोकारो मार्गे रांचीला सोडण्यात आलं. ही गाडी रात्री १.४५ वाजता रांची रेल्वे स्थानकावर पोहोचली.

दिल्लीहून राजधानी एक्स्प्रेस रांचीला जाण्यासाठी वेळेत सुटली होती. मात्र लातेहार जिल्ह्यातील टोरी येथील टाना भगतांचे रेल्वे ट्रॅकवर आंदोलन चालू होते. यामुळे डाल्टनगंज येथेच ट्रेन थांबवण्यात आली. आंदोलन संपेल, मग ट्रेन रांचीला मार्गस्थ होईल, असं अधिकाऱ्यांना वाटलं. मात्र, आंदोलन मागे न घेतल्यामुळे ट्रेन तिथेच थांबली होती. यामुळे याबाबतची माहिती रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना कळविण्यात आली. सदर घटनेची माहिती मिळताच अध्यक्षांनी सर्व प्रवाशांना बसमार्गे रांचीला पाठविण्याचे आदेश दिले आणि डाल्टनगंजमध्येच ट्रेन उभी करण्याची सूचना दिली.

- Advertisement -

यानंतर सर्व प्रवाशांना बसमधून गंतव्य स्थानाकडे पोहोटवण्यात आलं. मात्र अनन्या ट्रेनमधून उतरली नाही. ९३० प्रवाशांपैकी अनन्या ट्रेनमध्ये एकमेव प्रवासी होती. अनन्याला त्याच रेल्वेने रांचीला जायचं होतं. याबाबतची माहिती रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना सांगण्यात आली. डीआरएमला बोर्डाच्या अध्यक्षांनी अनन्याला राजधानी एक्स्प्रेसने रांचीला पाठविण्याचे निर्देश दिले. त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थादेखील करावी असंही सांगितलं. डाल्टनगंज ते रांची हे अंतर ३०८ किलोमीटर आहे. पण, ट्रेन गया येथून गोमो आणि बोकारो मार्गे रांचीला गेल्यामुळे ट्रेनला ५३५ किमी अंतर पार करावं लागलं. अनन्याला संरक्षण देण्यासाठी आरपीएफ महिला सैनिक तैनात करण्यात आली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -