घरदेश-विदेशवस्तू द्या जाहिराती करा- रेल्वेचा नवा निर्णय

वस्तू द्या जाहिराती करा- रेल्वेचा नवा निर्णय

Subscribe

रेल्वेमध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग केला जाणार असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. या आधी जाहिरातीचे आकार ठरलेले नव्हते. मोठ्यात मोठी जाहिरातही स्विकारली जायची. पण आता अनेकांना जाहिरात करता यावी यासाठी ६ इंच बाय ६इंच हा आकार ठरवण्यात आला आहे.

आता रेल्वेत जाहिरात करायची असेल तर भारतीय रेल्वेने नियमात बदल केला आहे. तुम्ही ज्या उत्पादनाची जाहिरात करु इच्छिता ते उत्पादन तुम्हाला रेल्वेच्या प्रवाशांना देणे गरजचे आहे. २७ डिसेंबर रोजी या नियमाचे परिपत्रक जारी करण्यात आले असून जी जाहिरात तुम्ही रेल्वेमध्ये पाहात असला तर ते उत्पादन तुम्हाला रेल्वे प्रवासात वापरता येणार आहे.

रेल्वे, प्राधिकरण,मंडळांनाच पिण्यासाठीच मिळणार पाणी

आता वापरा जाहिरातींमधील उत्पादने

रेल्वेतील जाहिरातींमध्ये अनेकदा साबण, शॅम्पू, सोप डिस्पेंसर, चादरी इत्यादींच्या जाहिराती अशा विविध उत्पादनांच्या जाहिराती असतात. आता या जाहिराती करण्यासाठी उत्पादकांना रेल्वेला पैसे द्यावे लागणार नाहीत. तर त्या ऐवजी जाहिरात करणारी वस्तू रेल्वेला द्यावी लागणार आहे आणि रेल्वे या वस्तू प्रवाशांना देणार आहेत. त्यामुळे तुम्हाला रेल्वेकडून मिळणाऱ्या सेवेदरम्यान एखादा साबण किंवा उत्पादन मिळाल्यास आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही.

- Advertisement -
नव्या वर्षापासून रेल्वे ‘जियो’मय

रेल्वेचा बार्टर प्रयोग

रेल्वेमध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग केला जाणार असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. या आधी जाहिरातीचे आकार ठरलेले नव्हते. मोठ्यात मोठी जाहिरातही स्विकारली जायची. पण आता अनेकांना जाहिरात करता यावी यासाठी ६ इंच बाय ६इंच हा आकार ठरवण्यात आला आहे. यासाठी उत्पादकांना रेल्वेच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करायची आहे. एक ठराविक कालावधी ठरवून २१ दिवसांसाठी रेल्वे अन्य उत्पादनाची वाट पाहिल आणि निवडक उत्पादकांना संधी देईल. यात प्रामुख्याने साबण, बेड रोल, सोप डिस्पेन्सर या जाहिरातींची रेल्वेला प्रतिक्षा आहे. ही जाहिरात प्रत्येक कोचच्या बाथरुमच्या दरवाजाला या जाहिराती लावण्याची अनुमती देण्यात येणार आहे. असे देखील या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -