आता रेल्वे प्लॅटफॉर्मची तिकीटे विनामूल्य, फक्त ‘हे’ करावं लागेल!

दिल्लीतील प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. आता प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट मोफत मिळणार आहे. मात्र त्याबदल्यात प्रवाशांना उठाबश्या काढाव्या लागणार आहेत.

New Delhi
indian railways introduces machines give free platform tickets exchange squats tutk
Ticket counters machines

गेल्या वर्षी रेल्वेने प्रवाशांसाठी एक सुविधा आणली. त्यामध्ये आपण प्लॅटफॉर्म टिकीटावरही रेल्वेतून प्रवास करू शकतो. अश्यातच दिल्लीतील प्रवाशांसाठी आणखी एक खुशखबर रेल्वेने आणली आहे. भारतीय रेल्वेने दिल्लीतल्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर एक मशीन बसवले आहे. त्या यंत्रामधून तुम्ही प्लॅटफॉर्मचे तिकीट विनामूल्य घेऊ शकता. मात्र तुम्हाला त्यासाठी या यंत्रासमोर उठाबश्या काढाव्या लागणार आहेत.

”उठाबश्या काढा मोफत तिकीटे मिळवा”

जे लोक १८० सेकंदात ३० वेळा उठाबश्या काढतील असेच लोक हे प्लॅटफॉर्म तिकिटासाठी पात्र ठरू शकतात. रेल्वेने फिटनेस राखण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. या यंत्राला ‘फिट इंडिया दंड बैठक मशीन’ असे नाव देण्यात आले आहे. या यंत्राचा व्हिडिओ रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि रेल्वे मंत्रालय यांनी ट्विट केला आहे. रेल्वेच्या या अनोख्या उपक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमके कसे काम करते हे यंत्र?

यासाठी तुम्हाला मशीनसमोर काही अंतरावर उभे रहावे लागते. त्यानंतर १८० सेकंदात ३० वेळा उठाबश्या काढव्या लागतात. सुरूवात केल्यानंतर यंत्रामध्ये वेळ दर्शवला जातो. १८० सेकंद संपताच ३० उठाबश्या पूर्ण झाल्या तर आपल्याला एक प्लॅटफॉर्म तिकीट मिळते. या अनोख्या उपक्रमाला प्रवाशांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळात आहे.

रेल्वेच्या जुन्या डब्यांपासून शाळेचे वर्ग 

याशिवाय रेल्वे मंत्रालयने भारतीय रेल्वेच्या जुन्या डब्यांचे वापर करून एक छान शाळा बनवली आहे. त्या डब्यांचा वापर करत शाळेमध्ये वर्ग बनवले आहेत. त्याचप्रमाणे, बिहारच्या दानापूरमधील जुन्या डब्यांच्या माध्यमातून दिल्लीतील स्टाफ कॅन्टीन आणि जुन्या राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयात एक कार्यालय तयार करण्यात आले आहे.