रेल्वेच्या तिकीट आरक्षणासंबंधी नियम बदलले; बुकिंग आणि कॅन्सलेशन आणखी सुलभ

प्रवशांना आता रेल्वे स्थानकामधून निघण्याच्या पाच मिनिटं अगोदरपर्यंत त्यांचे तिकीट बुक किंवा रद्द करता येणार

Check every outside passenger coming from train standing committee give order to administration
प्रातिनिधिक छायाचित्र

आजपासून अर्थात १० ऑक्टोबरपासून भारतीय रेल्वेने रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता प्रवाशांसाठी एक खास सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांना आता रेल्वे स्थानकामधून निघण्याच्या पाच मिनिटं अगोदरपर्यंत त्यांचे तिकीट बुक किंवा रद्द करता येणार आहे. १० ऑक्टोबरपासून ज्या विशेष रेल्वे सुरू होत आहेत, त्या सर्व रेल्वेंसाठी हा नियम लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

अर्धातास अगोदर दुसरा बुकींग चार्ट होणार तयार

तिकीट बुकींगचा दुसरा चार्ट रेल्वे स्थानकातून निघण्याच्या अर्धातास अगोदर जाहीर केला जाणार आहे. भारतीय रेल्वेने स्थानकांमधून रेल्वेंच्या ठरलेल्या निघण्याच्या वेळेच्या अर्धातास अगोदर दुसरा बुकींग चार्ट तयार करण्याच्या मागील प्रणालीस आजपासून लागू करण्याच निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांत करोना महामारीमुळे हा कालावधी रेल्वे निघण्याच्या दोन तास अगोदर असा केला गेला होता.

रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे की, कोरोनाच्या अगोदर नियमांनुसार पहिला बुकींग चार्ट रेल्वे स्थानकातून निघण्याच्या ठरलेल्या वेळेच्या किमान चार तास अगोदर तयार केला जात होता. जेणेकरून उपलब्ध असलेल्या जागा दुसरा बुकींग चार्ट तयार होईपर्यंत, अगोदर या अगोदर जागा मिळवा या आधारावर पीआरएस काउंटर आणि इंटरनेटच्या माध्यमातून बुक करता येतील.

सणा-सुदीच्या हंगामात रेल्वेकडून २०० ट्रेन

सणाच्या हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान २०० हून अधिक गाड्या चालवल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. गरज पडल्यास त्यांची संख्या आणखी वाढवता येईल, असं रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.


UP: ४५ यात्रेकरूंना घेऊन निघालेली खासगी बस उलटली