विनयभंग प्रकरणी दुबईत भारतीय सेल्समनला अटक

दुबईतील एका मॉलमधील सेल्समनने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुबई पोलिसांनी या सेल्समनला अटक केली आहे.

Dubai
molestation
प्रातिनिधिक फोटो

दुबईत काम करत असलेल्या एका भारतीय सेल्समनला दुबई पोलिसांनी विनभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. या सेल्समॅने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येत आहे. दुबईतील एका मॉलमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोप सेल्समनचा पासपोर्ट दुबई पोलिसांनी जप्त केला आहे. संबधित वृत्त दुबईच्या खलिज टाइम्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. पिडीत तरुणी ही १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी असल्याची माहिती मिळते आहे. आरोपी सेल्समन हा या मॉलमध्ये मागील काही महिन्यांपासून काम करत होता. या अटक सेल्समनने आपला गुन्हा मान्य केला आहे.

काय आहे प्रकरण

आरोपी सेल्समन हा ३१ वर्षीय आहे. मागील काही महिन्यांपासून तो दुबईतील मॉलमधील दुकानात सेल्समनचे काम करत होता. घटनेच्या दिवशी पीडित तरुणीची आई देखील या दुकानात होती. पीडित तरुणीची आई दुकानातील कामात व्यस्त  असताना आरोपी सेल्समनने तिच्या मुलीला मॉलच्या बेसमेंट मध्ये घेऊन गेला. याच ठिकाणी त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मॉलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. यानंतर या सेल्समनला अटक करण्यात आली.

“आरोपीने चौकशीदरम्यान आपला गुन्हा मान्य केला आहे. पीडित मुलीला अरेबियन ड्रेस घालण्यास मदत करत असल्याचे त्याने सांगितले होते.” – तपास अधिकारी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here