घरदेश-विदेशभारतीय शास्त्रज्ञांनी लावला नवीन ग्रहाचा शोध

भारतीय शास्त्रज्ञांनी लावला नवीन ग्रहाचा शोध

Subscribe

फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल), अहमदाबादमधील शास्त्रज्ञांच्या टीमनं शनिचा उपग्रह आणि सुपर नेपच्युनच्या आकाराच्या ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा २७ पट मोठा असून याची त्रिज्या पृथ्वीच्या सहपट आहे. माऊंट अबूमधील पीआरएल गुरूशिखर ऑब्झर्वेटरीमध्ये १.२ मीटर टेलिस्कोपसह स्वदेशी बनावटीच्या पीआरएल अॅडव्हान्स रॅडियल वेलोसिटी अबू – स्काय सर्च (पारस) स्पेक्ट्रोग्राफचा वापर करून या ग्रहाचा शोध लावण्यात आला. या शोधामुळं ताऱ्यांच्या भोवतालच्या ग्रहांचा शोध लावणाऱ्या देशामध्ये भारताचादेखील समावेश आता झाला आहे.

कसा आहे हा ग्रह?

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या ताऱ्याचं नाव EPIC 211945201 किंवा K2-236 असं असून EPIC 211945201b किंवा K2-236b म्हणून ग्रहाला ओळखले जाईल. हा ग्रह ताऱ्याभोवती सुमारे १९.५ दिवसामध्ये आपलं भ्रमण पूर्ण करतो. तर या ग्रहावरील तापमान हे ६०० अंश सेल्सियस इतकं आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या अंतराच्या तुलनेत हा ग्रह ताऱ्याच्या सातपट जवळ आहे.
पीआरएलच्या शास्त्रज्ञांनी दीड वर्ष केलेल्या निरीक्षणानुसार, या ग्रहाच्या एकूण वस्तुमानाच्या ६० ते ७० टक्के भाग हा बर्फ, सिलिकेट्स, लोखंड अशा जड घटकांनी व्यापलेला असल्याची शक्यता वर्तवली आहे.

- Advertisement -

कसा लावला शोध?

सुपर नेपच्युन अथवा शनिच्या उपग्रहांच्या हा ग्रह अगदी जवळ असल्यामुळे त्याची यंत्रणा समजून घेण्याच्या दृष्टीनं हा शोध महत्त्वाचा असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. नासाच्या के२ (केपलर २) फोटोमेट्रीतील माहितीनं ग्रहांविषयी स्पष्टता न मिळाल्यामुळेच पारस स्पेक्ट्रोग्राफचा वापर करून स्वतंत्र पद्धतीनं या ग्रहाचं मोजमाप करण्यात आलं.

ठळक वैशिष्ट्य

⦁ माऊंट अबूमधील १.२ मीटर टेलिस्कोपसह पारस स्पेक्ट्रोग्राफचा वापर करून या ग्रहाचा शोध लावण्यात आला.
⦁ ताऱ्यांच्या भोवतालच्या ग्रहांचा शोध लावणाऱ्या देशामध्ये भारताचादेखील समावेश आता झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -