घरदेश-विदेशअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे १३ वर्षाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे १३ वर्षाची शिक्षा

Subscribe

सिंगापूरमध्ये एका १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने १३ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याअंतर्गत एका भारतीय नागरिकाला सिंगापूर येथे १३ वर्षाची शिक्षा झाली आहे. ३१ वर्षीय हा आरोपी मागील काही महिन्यांपासून सिंगापूर येथील एका प्रायव्हेट स्टोरमध्ये कामगार होता. लैंगिक प्रकरणी दोषी आढळल्यावर त्याला अटक करून शिक्षा ठोठावण्यात आली. उधयकुमार धाक्षिनमोर्थी (३१) असे या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीला आपली पत्नी बनवण्याचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडने मोबाईलमध्ये या मुलीचे व्हिडिओ बघितले यानंतर ही माहिती उघडकी आली. आरोपीच्या गर्लफ्रेंडनेच त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली होती.

कसा घडला प्रकार

उधयकुमार धाक्षिनमोर्थी हा २०१६ पासून सिंगापूर येथील एका स्टोरमध्ये काम करत होता. या स्टोरमध्ये सामान घेण्यासाठी ही मुलगी येत होती. स्टोरमध्ये काम करत असताना आरोपी आणि मुलीची ओळख झाली. आरोपी हा मुलीला आयस्क्रीम देत होता. अनेकदा आरोपीने या मुलीला फिरायलाही नेले होते. फिरण्यासाठी तो ५ सिंगापूरी डॉलर्स देत होता. आरोपीने या अल्पवयीन मुलीला नग्न फोटोची मागणी करत होता. अनेकदा पैसे देऊन याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप मुलीने केला आहे. लहान असल्यामुळे लैंगिक संबध काय असतात याची कल्पना मुलीला नव्हती. अखेर या मुलीला याबाबत शांत राहाण्यासाठी त्याने ५० सिंगापूरी डॉलर्स तिला दिले होते.

- Advertisement -

कसा उघडला प्रकार

आरोपीचे मागील काही दिवसांपासून एका मुलीशी प्रेमसंबध होते. एकदा आरोपी झोपला असताना त्याच्या गर्लफ्रेंडने त्याचा मोबाईल तपासला. त्यावेळी या अल्पवयीन मुलीचे नग्न फोटो तिला दिसले. तसेच या मोबाईलमध्ये काही व्हिडिओही होते. त्याच्या गर्लफ्रेंडने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. अखेर आरोप सिद्ध झाल्यानंतर आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -