घरक्रीडाविराट रमलाय गल्ली क्रिकेटमध्ये!

विराट रमलाय गल्ली क्रिकेटमध्ये!

Subscribe

कर्णधार विराट कोहली गल्ली क्रिकेट खेळण्यात रमल्याचे दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

काही दिवसांपूर्वीच कोहलीने आपला ३१वा वाढदिवस भूतानमध्ये साजरा केला. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासुद्धा उपस्थित होती. त्यांच्या भूतानच्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता आणखीन एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये कर्णधार विराट कोहली गल्ली क्रिकेट खेळण्यात रमल्याचे दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

- Advertisement -

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हायरल व्हिडीओमध्ये विराट कोहली स्थानिक मुलांबरोबर गल्ली क्रिकेट खेळताना दिसत आहे. सध्या विराट इंदूरमध्ये आहे. एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. विराट सध्या इंदूरमधून असून तेथील स्थानिक मुलांसोबत विराटने गल्ली क्रिकेटचा आनंद लुटला. व्हिडिओच्या सुरुवातीला विराट कॅज्युअल्समध्ये दिसत आहे. तो मुलांमध्ये अतिशय आनंदात असून त्यांच्यासोबत क्रिकेट खेळताना विराट खूपच उत्साही दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -