घरटेक-वेकलाँच होताच 'हे' Made in India अ‍ॅप ५ लाख युजर्सने केले डाऊनलोड

लाँच होताच ‘हे’ Made in India अ‍ॅप ५ लाख युजर्सने केले डाऊनलोड

Subscribe

अवघ्या ३ दिवसांत ५ लाखांहून अधिक लोकांनी केले डाऊनलोड

सीमा वादानंतर चिनी उत्पादनावर बहिष्कार वाढला आहे. संपूर्ण देश संतापला आहे. भारतात अनेक चिनी अॅप्स आहेत ज्यांचा वापर कोट्यावधी लोक करत आहेत. भारतात फक्त टिकटॉकच्या वापरकर्त्यांची संख्या २० कोटी आहे, तर अशी अनेक चिनी अॅप्स आहेत जी बरीच लोकप्रिय आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांत चिनी अॅपच्या स्पर्धेत अनेक मेड इन इंडिया अ‍ॅप्स लाँच करण्यात आले आहेत, परंतु सर्वात जास्त व्हायरल जे अॅप झाले ते भारतात तीन दिवसांपूर्वी लाँच झाले आहे.

- Advertisement -

अवघ्या ३ दिवसांत ५ लाखांहून अधिक डाऊनलोड

रोपोसो (Roposo), मित्रों (Mitron) आणि बोल इंडिया (Bolo Indya) नंतर चिंगारी (Chingari) नावाचे मेड इन इंडिया app लाँच केले गेले आहे. ज्याला अवघ्या ३ दिवसांत ५ लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. चिंगारी हे एक शॉर्ट व्हिडिओ अॅप आहे. जे बंगळुरूच्या बिस्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी तयार केले आहे.

हिंदी आणि इंग्रजीसह १० भाषांमध्ये उपलब्ध

डेव्हलपरच्या दाव्यानुसार, लाँच झाल्यानंतर ३६ तासांच्या आत, चिंगारी अॅप गूगल प्ले-स्टोअरच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये होते. चिंगारी अॅप हिंदी आणि इंग्रजीसह १० भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्ले-स्टोअरवर दिलेल्या माहितीनुसार, यावर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता आणि आपल्या मित्रांसह शेअर करू शकतात. या अ‍ॅपवर तुम्हाला ट्रेंडिंग बातम्या, करमणूक, मजेदार व्हिडिओ, स्टेटस असे व्हिडिओ मिळतील. अ‍ॅपची वैशिष्ट्ये पाहता असे दिसते की, हे अॅप हॅलो अ‍ॅपसारखे आहे.

- Advertisement -

तुम्ही चिंगारीवर शेअर केलेल्या पोस्टवर लाईक आणि कमेंट्स करू शकतात. यावरील व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करण्यासाठी स्वतंत्र बटण देण्यात आले आहे, जे चिनी अॅप हॅलोसारखे आहे. अ‍ॅपमध्ये वापरकर्त्यास फॉलो करण्याची देखील संधी आहे.


आज Amazfit Stratos 3 स्मार्टवॉच लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -