घरदेश-विदेशविक्रम लँडरचा ठावठिकाणा कळला

विक्रम लँडरचा ठावठिकाणा कळला

Subscribe

ऑर्बिटरने पाठवली औष्णिक छायाचित्रे,संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू

आम्हाला विक्रम लँडरचा चंद्रावरील ठावठिकाणा कळाला आहे. ऑर्बिटरने विक्रम लँडरची औष्णिक छायाचित्रे टिकली आहेत. पण लँडरशी आमचा संपर्क होऊ शकलेला नाही. आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी सांगितले.

चंद्रायान-२ च्या विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लॅण्डींग न होता ते क्रॅश झाल्याचे सांगण्यात आले होते. हे असे नेमके का झाले, या कारणांचा इस्रोकडून शोध सुरू होता. ही कारणमिमांसा होत असताना चार पायाच्या विक्रम लँण्डरचा इस्रोला शोध लागला आहे. ऑर्बिटरने विक्रम लँडरचे औष्णिक छायाचित्र पाठवले आहे.

- Advertisement -

या छायाचित्रामुळे विक्रम लँण्डर चंद्रावर नेमके कुठल्या ठिकाणी आहे, याचा पत्ता लागला आहे. ऑर्बिटरने पाठवलेल्या माहितीचा अभ्यास सुरू आहे, असे के. सिवन यांनी सांगितले. विक्रम लँडरचे ७ सप्टेंबर रोजी चंद्रावर सॉफ्ट लॅण्डींग होणार होते. ऑर्बिटरमधून लँडर चंद्राच्या पृष्ठभागाकडे निघाले आणि काही मिनिटांतच त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे इस्रोने चांद्रयान-२ ही मोहिम अपयशी झाल्याचे जाहीर केले.

चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. संपर्काचे प्रयत्न सुरू असल्याचे इस्रोतर्फे सांगण्यात आले होते. विक्रम लँडर कुठे आहे याची माहिती दोन ते तीन दिवसात मिळू शकते, असं इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले होते. त्यानंतर आज, रविवारी चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरसंदर्भात महत्वाची माहिती मिळाली आहे. लँडरची माहिती मिळाली आहे. ऑर्बिटरने लँडरची थर्मल छायाचित्रे टिपली आहेत, असं सिवन यांनी सांगितलं. अद्याप विक्रम लँडरशी संपर्क होऊ शकला नाही. संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच संपर्क होईल, असा विश्वासही सिवन यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

नासाने केले इस्रोचे कौतुक
चांद्रयान-२ मोहिमेबाबत अमेरिकेची जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासाने इस्रोचे कौतुक केले आहे. अंतराळ शोध मोहिम कठिण आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅण्डर उतरवण्याच्या इस्रोचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. इस्रोच्या या प्रवासाने आम्हाला प्रेरणा दिली आहे. आपण सौरमंडळात शोध घेण्यासाठी भविष्यात एकत्रित काम करू, असे नासाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -