घरदेश-विदेशभारतीय विद्यार्थी देतात गृहपाठ न करण्याची मजेशीर कारणे: सर्वेक्षण

भारतीय विद्यार्थी देतात गृहपाठ न करण्याची मजेशीर कारणे: सर्वेक्षण

Subscribe

भारतीय विद्यार्थी गृहपाठ न करण्याची मजेशीर कारणे देत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे मूल गृहपाठ करण्यास उत्सुक नाही आणि ते दर वेळी वेगवेगळी कारणे देते, तर असे वाटणारे तुम्ही एकटेच नाहीत. विद्यार्थी आणि गृहपाठ यांच्यातील कडूगोड नातेसंबंध जाणून घेण्यासाठी ब्रेनलीया जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन पीयरटूपीयर लर्निंग कम्यूनिटीने केलेल्या सर्वेक्षणातून समजले की, जवळपास ४९% विद्यार्थ्यांनी गृहपाठ करण्यात आपण कधीना कधी टाळाटाळ करीत असल्याचे कबूल केले. तसेच ते वेगवेगळी कारणे देत असल्याचेही सांगितले. जेव्हा विद्यार्थ्यांना कारणे देण्याची आवश्यकता निर्माण होते तेव्हा ते ‘गृहपाठ हरवला’ (१८.%), ‘वैयक्तिक इजा’ (१४.%), अशा कारणांसह ‘कुत्र्याने गृहपाठ खाल्ला’(%), ‘कोणीतरी माझ्या दप्तरातून पळवले’(१३.%), ‘त्याच्यावर शाई सांडली’ (.%) अशी काही मजेशीर करणे देखील देतात.

ही देतात मजेशीर कारणं

२ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचा आढावा घेणाऱ्या या सर्वेक्षणात वेळेवर गृहपाठ न केल्याच्या विद्यार्थ्यांनी पुढे केलेल्या कारणांबाबत जाणून घेण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे यापैकी ६९.% धाडसी विद्यार्थ्यांचा गट म्हणाला की, त्यांनी कधीच कारणे दिली नाही. तर जवळपास ३०% विद्यार्थ्यांनी ते वारंवार सबबी सांगत असल्याचे मान्य केले. कारणे देताना, ती यशस्वी व्हावीत यासाठी विद्यार्थी शक्यतो अस्सल आणि पटणारी, असे दोन महत्त्वपूर्ण घटक असलेली सबब शोधत असतात. या कारणांमध्ये ‘गृहपाठ हरवला’, ‘डोकेदुखी’ (१४.%), ‘सांगता न येण्याजोगे कुटुंबात उद्भवलेले संकट’ (.%), ‘वैयक्तिक इजा’(१४.%) या सामान्य कारणांसह ‘कुत्र्याने गृहपाठ खाल्ला’(%), ‘कोणीतरी माझ्या दप्तरातून पळवले’(१३.%), शाई किंवा कॉफी सांडली’ (.%),‘लॅपटॉप क्रॅश झाला’(.%), ‘दुसऱ्या क्लासच्या वहीत केले’(.%),‘माझ्या हातातून वाऱ्याने उडून गेले’(%),‘आगीत जळून गेले’(.%)’ आदी मजेशीर कारणांचा देखील समावेश होता.

- Advertisement -

या सर्व मजेशीर प्रतिसादांमध्ये ७०% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वाटते की जर त्यांना पुरेशी ऑनलाइन मदत मिळाली तर ते त्यांचा गृहपाठ वेळेत पूर्ण करतील. त्यामुळे नजिकच्या भविष्यात विद्यार्थ्यांना अधिक लाभ मिळण्यासाठी इंटरनेटला एक संसाधनात्मक स्थान बनविण्याची तीव्र आवश्यकता असल्याचे सूचित होते.

अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना गृहपाठाची नेहमीच भीती वाटत राहिली आहे. आम्ही या सर्वेक्षणाद्वारे काही बाबी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि बहुतांशी वेळा गृहपाठाच्या समस्यांमधून बाहेर पडण्यातील असमर्थता हेच या सबबींच्यामागचे कारण असते. पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्वीकृती आणि कौतुक मिळाल्यावर गृहपाठ करण्यासाठी सहयोगी वृत्ती दिसून येते. उत्साही वातावरणात एक पीयरटूपीयर दृष्टिकोन असणे ही केवळ गृहपाठ मनोरंजक आणि आकर्षक ठेवण्याची संकल्पना नाही तर त्याच्यामुळे शिक्षणही अधिक प्रभावी बनते. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्रोत आणि सहयोग स्वीकारल्यास, ब्रेनलीसारख्या व्यासपीठामुळे गृहपाठाची कार्यपद्धत कमी कठीण आणि अधिक फलदायी होऊ शकते. अधिक शिकायला मिळते आणि विद्यार्थ्यांना प्रश्नांपासून उत्तरापर्यंतचे मार्गदर्शन मिळते.  मिशल बोर्कोस्की, ब्रेनलीचे सहसंस्थापक आणि सीईओ

- Advertisement -

हेही वाचा – गृहपाठ न केल्याने खासगी शिक्षिकेची विद्यार्थीनीला मारहाण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -