घरदेश-विदेशमहिला जॉर्डनमध्ये अडकली; कुटुंबियांची सुषमा स्वराज यांना हाक

महिला जॉर्डनमध्ये अडकली; कुटुंबियांची सुषमा स्वराज यांना हाक

Subscribe

हैद्राबादची एक महिला जॉर्डन विनानतळावर अडकली आहे. पासपोर्टची मुदत संपल्यामुळे जॉर्डन पोलिसांनी तिला अटक केली आहे. या महिलेच्या सुटकेसाठी तिच्या घरच्यांनी सुषमा स्वराज यांना मदतीची हाक दिली आहे.

मुदत संपलेला पासपोर्ट घेऊन आंतरराष्ट्रीय प्रवास करणं एका महिलेला चांगलच महागात पडलं आहे. ही महिला हैद्राबादची आहे. ती आपल्या पतीसोबत येमेन येथे वास्तव्यास आहे. या महिलेचे नाव सबिहा असं आहे. सबिहाच्या पासपोर्टची मुदत संपली होती. तरीदेखील त्या पासपोर्टवर सबिहा भारतात येऊ पाहत होत्या. मात्र, जॉर्डन विमानतळावर झालेल्या तपासणीत सबिहा पकडल्या गेल्या. त्यामुळे त्यांना जॉर्डन विमानतळावरील पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, सबिहांची सुटका व्हावी यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी परराष्ट्र मंत्रालयात धाव घेत सुष्मा स्वराज यांना मदतीची हाक दिली आहे.

‘सुष्मा स्वराज यांनी मदत करावी’

सबिहा यांचे लग्न येमेन या देशात १९८३ साली लग्न झालं होतं. ती २००६ पासून दार अल-हजरला ती वास्तव्यास आहे. २००६ साली तिचं पासपोर्ट बनवण्यात आलं होतं. या पासपोर्टची मुदत २०१६ साली संपली, अशी माहिती सबिहा यांचा भाऊ फारुख अली यांनी दिली. यापुढे फारुख म्हणाले की, ‘येमेन येथील भारतीय दूतावात सबिहा यांचे पासपोर्टचे काम झालं नाही. त्यामुळे सबिया यांनी मुदत संपलेल्या पासपोर्टसह प्रवास करण्याचं ठरवलं. त्या जेद्दाह येथून जॉर्डन आणि जॉर्डनवरुन हैद्राबादला येणार होत्या. मात्र जॉर्डनच्या विमानतळावरील स्थानिक प्रशासनाने त्यांना अटक केली आहे. त्यामुळे सुषमा स्वराज यांनी यासाठी आम्हाला मदत करावी.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -