घरदेश-विदेशऑक्सफर्डच्या शब्दकोशात ३८४ भारतीय शब्दांचा समावेश

ऑक्सफर्डच्या शब्दकोशात ३८४ भारतीय शब्दांचा समावेश

Subscribe

ऑक्सफर्डच्या शब्दकोशात यंदा हिंदी भाषेतील काही शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी ऑक्सफर्डच्या नव्या आवृतीचे प्रकाशन करण्यात आले. आधार, डबा, चॉल, हडताल आणि शादी या शब्दांचा समावेश शब्दकोशात करण्यात आला आहे. ऑक्सफर्डची ही १० वी आवृती असून यात ३८४ भारतीय शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.

दरवर्षी ऑक्सफर्ड शब्दकोशात भारतातील तसेच जगभरातील विविध भाषांमधील शब्दांचा समावेश करण्यात येतो. त्याप्रमाणे यंदा एकूण एक हजार जगभरातील भाषांचा समावेश करण्यात आला आहे. प्रासंगिक आणि अप-टू-डेट असलेल्या शब्दांचा नव्या आवृतीत समावेश करण्यावर आमचा नेहमीच भर असतो, असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने म्हटलं आहे.

- Advertisement -

ऑक्सफर्डच्या वेबसाइटमध्ये ऑडीओ-व्हिडीओसह नवे फिचर्सही देण्यात आले आहेत. यंदा ऑक्सफर्डच्या नव्या आवृतीत २६ नव्या भारतीय शब्दांचा समावेश करण्यात आला असून त्यातील २२ शब्द प्रिंटेड डिक्शनरीत वाचायला मिळतील. इतर चार शब्द हे डिजिटल डिक्शनरीत समाविष्ट करण्यात येतील असे ऑक्सफर्डकडून सांगण्यात आले आहे. बस स्टँड, डिम्ड युनिव्हर्सिटी, एफआयआर, नॉन व्हेज, रिड्रेसल, टेम्पो, ट्यूबलाइट, व्हेज, व्हिडिओग्राफी अशा शब्दांचा डिक्शनरीत समावेश आहे. तसेच लूटर, लिटिंग आणि अपजिल्हा हे शब्द डिजिटल डिक्शनरीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -