देशात कोरोनाचा विस्फोट, ब्राझीलला मागे टाकत जगात दुसऱ्या स्थानी

India's COVID19 case
देशाची आकडेवारी

देशातील कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. कोरोनाबाधितांच्या यादीत भारताने आता ब्राझीलला मागे टाकत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. देशात मागील २४ तासांमध्ये तब्बल ९० हजार ८०२ नवे करोनाबाधितांची नोंद झाली असून, देशात कोरोनाबाधितांचा आकडा ४२ लाखांच्या पार गेली आहे. गेल्या २४ तासांत १ हजार १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जगात सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत भारत दुसऱ्यास्थानी पोहोचला असून, भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका आहे. देशातील एकूण ४२ लाख ४ हजार ६१४ कोरोना रुग्णांमध्ये ८ लाख ८२ हजार ५४२ Active रुग्ण आहेत. आतापर्यंत ३२ लाख ५० हजार ४२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आलं आहे. आतापर्यंत ७१ हजार ६४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

covid world wide