चिंता वाढतेय! २४ तासांत देशात ९४ हजार ३७२ कोरोनाबाधित रूग्ण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतातही झपाट्याने होत आहे. देशात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येनं ४७ लाखांचा टप्पा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९४ हजार ३७२ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. मागील तीन दिवसांच्या तुलनेत शनिवारी कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांत देशात ९६ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळले होते.

गेल्या २४ तासांत देशात ९४ हजार ३७२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ लाख ५४ हजार ३५७ झाली आहे. ९ लाख ७३ १७५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले

देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाणही वाढत आहे. रूग्ण बरे होणाऱ्यांचं देशातील प्रमाण ७७.७७ टक्क्यांवर पोहचला आहे. देशात आतापर्यंत ३७ लाख दोन हजार ५९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ७८ हजार ५८६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशातील १३ राज्यांत एक लाखांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण झाले आहेत.


हे ही वाचा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा  एकदा रुग्णालयात दाखल!