घरदेश-विदेशअपघात ग्रस्तांसाठी 'टॅक्सी अॅम्ब्युलन्स' सुविधा

अपघात ग्रस्तांसाठी ‘टॅक्सी अॅम्ब्युलन्स’ सुविधा

Subscribe

दिल्लीमध्ये 'टॅक्सी अॅम्ब्युलन्स' सुविधेची सुरुवात

कॅब आणि टॅक्सी यांच्या वाढलेल्या संख्येमुळे प्रवासाची चिंता मिटलेली आहे. आता तर टॅक्सी घेण्यासाठी स्टॅण्डपर्यंत जाण्याचेही कष्ट लागत नाही. ऑनलाईन सुविधेमुळे मोबाईलवरच टॅक्सी उपलब्ध झाली आहे. अशा लाखो कॅब आणि टॅक्सी आपल्या सेवेसाठी हजर असतात. कॅब आणि टॅक्सींचा उपयोग आता आणखी एका उपक्रमासाठी होणार आहे. दिल्लीमध्ये ‘वॅगोन कॅब’ या कंपनीने एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. आता या उपक्रमाद्वारे टॅक्सी रस्त्यावरील दुर्घटना बाधित प्रवाशांना प्रथमोपचारसाठीही धावणार आहेत.

उपक्रमाचे स्वागत सामाजिक संस्थानी केले

दिल्लीच्या गुरुग्राममध्ये ‘वॅगोन कॅब’ कंपनीने रस्त्यावरील अपघातग्रस्त प्रवाशांना प्रथमोपचारासाठी टॅक्सी अॅम्ब्युलन्स सुविधा सुरु केली आहे. कंपनीच्या या उपक्रमाला ‘दास फाऊंडेशन’ नावाच्या सामाजिक संस्थेने स्वागत केले आहे. या संस्थेच्या संचालिका योगिता भयाना यांनी न्युज१८ शी बोलताना सांगितले की, ‘माझा ठामपणे विश्वास आहे की, या सुविधेचा खरोखर गरजू लोकांना मदत होईल’. या उपक्रमासाठी कंपनीने २०० कॅब सुरु केल्या आहेत. या २०० कॅबचे ड्राइव्हर दुर्घटनाग्रस्त प्रवाशांना औषधे पुरवणार आहेत. कॅबच्या ड्रायव्हरांना प्रत्येक मदतीमागे ५०० रुपये कंपनीकडून मिळणार आहेत.

- Advertisement -

उपक्रम यशस्वी ठरल्यास संपूर्ण भारतात

दिल्लीच्या एनसीआरमध्ये आजपासून ही सुविधान देण्यास सुरवात झाली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. हा उपक्रम खरच यशस्वी ठरला, तर लवकरच संपूर्ण भारतात सुरु होणार असल्याचे कंपनीने सांगितले. टॅक्सी ड्राइव्हर रस्त्यावरच गाडीतून फिरत असतात. यावेळी जर त्यांच्यासमोर कुठली दुर्घटना घडली, तर ते मदत करु शकतात. त्याबदल्यात त्यांना कंपनीकडून पैसेही मिळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -